PSL vs IPL esakal
IPL

PSL vs IPL : पाकिस्तान करणार धरमशालाची कॉपी; PSL ला IPL सारखी झळाळी देण्यासाठी सुरू केली धडपड

अनिरुद्ध संकपाळ

PSL vs IPL Quetta Cricket Stadium : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हे त्यांची टी 20 लीग पाकिस्तान सुपर लीगची तुलना ही कायम आयपीएलशी करत असते हे आपल्या सर्वांना ठाऊकच आहे. मात्र आयपीएलचा दर्जा आणि पीएसएलचा दर्जा यात जमीन आसमानचा फरक आहे. आता पाकिस्तानने पीएसएलचा दर्जा सुधारण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे.

भारतात जगातील सर्वात सुंदर स्टेडियम पैकी एक असे धरमशालाचे क्रिकेट स्टेडियम आहे. याच धरतीवर पाकिस्तान देखील आपल्या देशात धरमशालासारखं सुंदर दिसणारं स्टेडियम तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. क्वेट्टा येथील क्रिकेट स्टेडियमवर आता फ्लड लाईट्स लावण्याचं काम सुरू झालं आहे. तेथे पाकिस्तान सुपर लीगमधील सामने खेळवण्याचा मानस पीसीबीचा आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन नक्वी यांनी सांगितले की, 'पीसीबी आपलं वचन पूर्ण करणार. क्वेटा येथील स्टेडियममध्ये फ्लड लाईट्स लावण्याचं काम सप्टेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होणार आहे. पाकिस्तान सुपर लीगचे सामने तेथे खेळवण्यात येणार आहे.

क्वेट्टा येथील नवाब अकबर खान बुगटी क्रिकेट स्टेडियमला भेट दिल्यानंतर नक्वी म्हणाले की, 'क्वेट्टा येथील स्टेडियमवर पाकिस्तान सुपर लीगचे सामने आयोजित करण्याबाबत आता वाट पहावी लागणार नाही.

पाकिस्तान सुपर लीगचा 2025 मधील हंगाम हा 7 एप्रिल ते 20 मे दरम्यान होणार आहे यावर देखील शिक्कामोर्तब झालं आहे. हा हंगाम कराची, लाहोर, मुल्तान आणि रावळपिंडी येथे खेळवला जाणार आहे. फ्रेंचायजी यापूर्वी आयपीएलचा हंगाम सुरू असतानाच पाकिस्तान सुपर लीगचा हंगाम सुरू करण्यास विरोध करत होते. मात्र पासीबीने तरी देखील हा निर्णय घेतला आहे.

(Cricket Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinnar Bus Stand Accident Video : नाशिकच्या सिन्नरमध्ये बसस्थानकातच भीषण अपघात; वेगात आलेली बस थेट फलाटवर उभ्या प्रवाशांमध्ये घुसली

Neurologist Tips For Better Sleep: तुम्हालाही झोप येत नाही? न्यूरोलॉजिस्ट सांगतात ‘या’ 3 सवयी बदलल्या तर येईल शांत झोप

StudyRoom Live Sessions: १२ वी नंतर स्पर्धा परीक्षांची तयारी कशी सुरू करावी? जाणून घ्या सकाळ+ स्टडीरूमचे खास लाईव्ह सेशनमध्ये

India Post App : रांगेत उभे राहण्याची गरज नाही! डाक विभागाचे 'डाक सेवा २.०' ॲप लॉन्च; सर्व टपाल सेवा आता एका क्लिकवर

Horoscope Prediction : उंदीर, वाघ की डुक्कर ! चायनीज ज्योतिषशास्त्रानुसार तुमची रास आणि स्वभाव घ्या जाणून

SCROLL FOR NEXT