CSK IPL 2024
CSK IPL 2024 sakal
IPL

CSK IPL 2024 : धोनीऐवजी ऋतुराज... निर्णय अनपेक्षित नव्हताच

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आयपीएल सुरू होण्याच्या आदल्या दिवशीच चेन्नई संघाच्या नेतृत्वात झालेला मोठा बदल महेंद्रसिंग धोनीऐवजी ऋतुराज गायकवाड ही घडामोड अनपेक्षित नव्हतीच. दोन वर्षांपूर्वीपासून चेन्नई संघाने धोनीचा उत्तराधिकारी कोण याचा शोध घेणे चालू केले होते. रवींद्र जडेजाला कप्तान बनवताना संघ व्यवस्थापनाच्या मनात थोडी धाकधूक होती.

जडेजाने अगोदर कोणत्याच संघाचे नेतृत्व केले नव्हते, म्हणून साशंकता होती. खेळाडू म्हणून जडेजा कोणत्याही कप्तानाचा अगदी उजवा हात ठरत होता. दुसरीकडे कप्तानी करण्याचा अनुभव आणि जात्याच विचारसरणी नसल्याने जडेजा अडखळला. त्याचा परिणाम संघाच्या कामगिरीवर झाला, ज्याने त्याच्या वैयक्तिक कामगिरीवरही विपरित परिणाम झाला. बाण इतका चुकला, की जडेजाने शेवटचे काही सामने न खेळता घरी परतणे पसंत केले. तेव्हापासून ऋतुराजचा विचार केला गेला होता.

ऋतुराज गायकवाडला जबाबदारी सोपवताना केलेल्या विचारांमागे त्याची सातत्यपूर्ण कामगिरी, त्याचे संघातील पक्के स्थान, त्याचा धोनीप्रमाणेच शांत, विचारी स्वभाव आणि शेवट म्हणजे त्याने महाराष्ट्र रणजी संघाचे नेतृत्व केले असल्याने जमा झालेला अनुभव या मुद्द्यांवर भर दिला गेला होता. त्याचबरोबर नवा कप्तान नेमताना तो किमान पुढची काही वर्षं संघाला पुढे नेण्याचे काम करेल याचा विचारही केला गेला असणार. ऋतुराज गायकवाडने महाराष्ट्राकडून, भारतीय ‘अ’ संघाकडून, पश्चिम विभागाकडून, मुख्य भारतीय संघाकडून भरपूर सामने खेळले आहेत.

ऋतुराजला अगोदरच कल्पना?

हा निर्णय अनपेक्षित नसण्याचे अजून एक कारण असेही आहे, की इतकी मोठी जबाबदारी आणि सर्वार्थाने मोठा मान मिळवत असताना घरचे लोक हजर असावेत या विचारांनी ऋतुराज गायकवाडने आपल्या पत्नीसह अगदी जवळच्या लोकांना अगोदरच चेन्नईला बोलावून ठेवले होते असेही कळले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : अमेरिका, कॅनडा अन् अरब देशांकडून 'आप'ला फंडिंग; ED कडून गृहमंत्रालयाला अहवाल

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंबईतील विले पार्ले येथील शाळेत बरोबर ६ वाजता मतदान बंद

Gadchiroli News : कधी वाघ, कधी हत्ती...सोसायचे किती? ग्रामस्थ भयछायेत; जंगलात तेंदूपाने संकलन करताना जीव मुठीत!

Ebrahim Raisi: इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

SCROLL FOR NEXT