BCCI Action on Shimron Hetmyer sakal
IPL

क्वालिफायर-2 हरल्यानंतर RRला आणखी एक धक्का! 'त्या' कृत्यामुळे BCCIने स्टार खेळाडूविरुद्ध उचललं मोठं पाऊल

BCCI Action on Shimron Hetmyer : आयपीएल 2024 च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये संजू सॅमसनच्या संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

Kiran Mahanavar

BCCI Action on Shimron Hetmyer : आयपीएल 2024 च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये संजू सॅमसनच्या संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पॅट कमिन्सचा संघ सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला.

आता या सामन्यानंतर बीसीसीआयने राजस्थानच्या स्टार खेळाडूवर कारवाई केली आहे. एका चुकीमुळे बीसीसीआयने या खेळाडूविरुद्ध हे मोठं पाऊल उचललं.

बीसीसीआयने खेळाडूला काय दिली शिक्षा?

राजस्थान आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या क्वालिफायर 2 सामन्यात आरआरला एकतर्फी पराभवाला सामोरे जावे लागले आहे. हैदराबादने राजस्थानसमोर विजयासाठी 176 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे आरआरला गाठता आले नाही.

यादरम्यान आरआरचा स्टार खेळाडू शिमरॉन हेटमायर फटका बसला. त्याने आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन होते, ज्यामुळे बीसीसीआयने शिमरॉन हेटमायरला मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावला. सतत पडणाऱ्या विकेट्समुळे हेटमायर त्रस्त झाला होता, पण तोही 10 चेंडूत केवळ 4 धावा करून बाद झाला. आणि आऊट झाल्यानंतर त्याने रागात बॅट आपटले.

अंतिम सामना २६ मे रोजी

सनरायझर्स हैदराबादने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता आयपीएल 2024 चा अंतिम सामना हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. हा सामना चेपॉक स्टेडियम, चेन्नई येथे होणार आहे.

याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. हैदराबादने ही ट्रॉफी जिंकल्यास त्याची ही दुसरी ट्रॉफी असेल. दुसरीकडे, कोलकाताने ही ट्रॉफी जिंकल्यास त्यांच्यासाठी ही तिसरी ट्रॉफी असेल. याआधीही केकेआरने गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली दोनदा ट्रॉफी जिंकली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT