Arjun Tendulkar IPL Debut For Mumbai Indians
Arjun Tendulkar IPL Debut For Mumbai Indians  esakal
IPL

अर्जुन तेंडुलकरचा वानखेडेवर होणार का आयपीएल डेब्यू?

अनिरुद्ध संकपाळ

Arjun Tendulkar News: वानखेडे स्टेडियम हे मुंबई इंडियन्ससाठी खास आहे. तसे ते सचिन तेंडुलकरसाठी देखील खास आहे. याच मैदानावर 2011 साली भारतीय संघाने सचिन तेंडुलकरचे स्वप्न पूर्ण केले. भारताने वर्ल्डकप जिंकला. आज सचिन तेंडुलकरसाठी पुन्हा एकदा वानखेडे स्टेडियम खास क्षण घेऊन येण्याची शक्यता आहे. मुंबईच्या यंदाच्या हंगामातील शेवटचा सामना वानेखेडे स्टेडियमवर होणार आहे. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) आज आयपीएल पदार्पण (IPL Debut) करण्याची शक्यता आहे.

जर मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला अंतिम 11 च्या संघात स्थान दिले तर ज्या मैदानावर सचिन तेंडुलकर आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दितील अखेरचा सामना खेळा होता. त्याच मैदानावरून अर्जुन तेंडुलकर आपली आयपीएल कारकिर्द सुरू करेल. त्यामुळे आज मैदानावर अर्जुन... अर्जुन अशा नावाचा जयघोष होण्याची शक्यता आहे. मात्र या सर्व गोष्टी मुंबई इंडियन्सने जर अर्जुन तेंडुलकरला अंतिम 11 च्या संघात स्थान दिले तरच शक्य होणार आहे. दरम्यान, चाहत्यांनी मात्र आता तरी मुंबईने अर्जुन तेंडुलकरला संधी द्या अशी मागणी करत सोशल मीडियावर मोहीमच उघडली आहे.

गेल्या सामन्यात हैदराबाद विरूद्ध नाणेफेकीवेळी रोहित शर्माने (Rohit Sharma) सांगितले होते की, संघ आयपीएल 2023 च्या अनुशंगाने नव्या खेळाडूंना संधी देत आहे. मुंबईचे नवे खेळाडू म्हटले की पहिले नाव अर्जुन तेंडुलकरचेच येते. तो गेल्या हंगामात देखील मुंबईच्या संघासोबत होता. मात्र अजूनही त्याला आपली प्रतिभा सिद्ध करण्याची संधी मिळालेली नाही. दुसरीकडे मुंबई इंडियन्स एका पाठोपाठ एक सामने गमावत आहे. त्यामुळे चाहते आता अर्जुन तेंडुलकरला संधी द्या अशी मागणी करू लागले आहे. मात्र ज्यावेळी अर्जुन तेंडुलकर मैदानावर उतरले त्यावेळी त्याची तुलना सचिन तेंडुलकरबरोबर नक्कीच होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीने गमावली नववी विकेट, 150 धावांचा टप्पा गाठणार?

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT