SRH Speed Star Umran Malik
SRH Speed Star Umran Malik ESAKAL
IPL

मीच माझा 'रोल मॉडेल', स्पीडस्टार उमरान मलिकने स्पष्टच सांगितले

सकाळ डिजिटल टीम

IPL 2022 : सनराईजर्स हैदराबाजचा स्पीडस्टार उमरान मलिक (Umran Malik) यंदाच्या आयपीएल हंगामात आपल्या वेगामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. तो सातत्याने 145 ते 150 किलोमिटर प्रती तास वेगाने गोलंदाजी करत फलंदाजाच्या मनात धडकी भरवत आहे. चर्चेचा विषय ठरलेल्या उमरान मलिकला भारतीय संघात स्थान द्या अशी मागणी आतापासूनच होत आहे. दरम्यान 22 वर्षाच्या या वेगावान गोलंदाजाने (Fast Bowler) एका मुलाखतीत सांगितले की त्याच्या गोलंदाजीतला वेग हा नैसर्गिक आहे. वेग प्राप्त करण्यासाठी त्याने कोणती विशेष गोष्ट केलेली नाही.

याच मुलाखतीत मलिकने त्याला इरफान पठाणने (Irfan Pathan) दिलेले मार्गदर्शन कसे कामी आले हे सांगितले. मलिक म्हणाला की मी यापूर्वी चेंडू टाकताना खूप आधी उडी मारत होतो. त्यामुळे चांगल्या लेंथवर गोलंदाजी करता येत नव्हती. मात्र इरफान पठाणच्या योग्य सल्ल्यामुळे मी आता माझी लाईन आणि लेंथ चांगलीच सुधारली आहे. मलिकने यंदाच्या हंगामात आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत. त्यात त्याने 9 विकेट घेतल्या आहेत.

दरम्यान, मलिकने एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले की, 'माझा वेग हा नैसर्गिक आहे. या वर्षी मी योग्य टप्यावर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत आहे. मी नेहमीच वेगाने गोलंदाजी करत होतो. मीच माझा रोल मॉडेल (Role Model) आहे. ज्यावेळी इरफान पठाण आम्हाला कोचिंग करण्यासाठी आले त्यावेळी मी खूप आधी उडी मारून गोलंदाजी करत होतो. त्यामुळे माझ्या गोलंदाजीत सातत्य नव्हते. मात्र त्याने मला उडी कमी करण्यास सांगितले त्यानंतर मला योग्य लय सापडली. मला फक्त जम्मू काश्मीरचा (Jammu Kashmir) गौरव वाढवायचा आहे. मला देशाचा गौरव वाढवायचा आहे. मला फक्त चांगली कामगिरी करायची आहे.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

RR vs KKR : राजस्थान अपयशाची मालिका खंडित करणार? अव्वल स्थानावर असलेल्या कोलकताविरुद्ध आज सामना

Vastu Tips: घरात चांदीच्या वस्तू कुठे ठेवाव्या, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं?

Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक घटना! लोकलमधून उतरल्यावर तरूणीवर टाकले ज्वलनशील पदार्थ, लॅपटॉप अन् हार केला चोरी

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

SCROLL FOR NEXT