Virat Kohli And Gautam Gambhir Fight 
IPL

Kohli-Gambhir Fight: कोहली अन् गंभीर मैदानात का भिडले? जाणून घ्या संपूर्ण भांडणाची Inside Story

गौतम गंभीरसोबत 'भांडणा'पूर्वी विराट कोहलीला कुणी डिवचलं?

Kiran Mahanavar

Virat Kohli And Gautam Gambhir Fight : इंडियन प्रीमियर लीगमध्ये काल रात्री एकना स्टेडियमवर यजमान लखनौ सुपरजायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात सामना झाला. आरसीबीचा विराट कोहली आणि भारताचा माजी सलामीवीर म्हणजेच लखनौ संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीर यांच्यात मैदानावर जोरदार भांडण झाली.

दोन्ही दिग्गजांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. अनेक खेळाडू मध्यस्थी करण्यासाठी आले, पण विराट-गौतमचा सूर वेगळाच होता. हळुहळू या घटनेचे अनेक व्हिडीओ इंटरनेटवर येत आहेत. या संपूर्ण वादाचे मूळ आणि दोघांमधील भांडण का सुरू झाले ते आपण समजावून घेऊया.

खरं तर, संपूर्ण वाद काही आठवड्यांपूर्वी म्हणजे 10 एप्रिलच्या रात्री लखनौने बंगळुरूला घरच्या मैदानावर पराभूत केल्यानंतर एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर गौतम गंभीरच्या हावभावाने सुरू झाली. त्याच्या चाहत्यांच्या या अपमानाची वेदना कोहलीच्या हृदयात कुठेतरी दडली होती, जी तो काल रात्रीच्या सामन्यात पुन्हा पुन्हा दाखवताना दिसला.

कुठून सुरू झाला वाद?

विराटने चौथ्या षटकात लखनौचा फलंदाज कृणाल पांड्याचा लाँग ऑफवर झेल घेतला तेव्हा त्याचा उत्साह पाहण्यासारखा होता. तो स्टँडकडे बघत छाती ठोकत होता आणि मग फ्लाइंग किस दिला. यानंतर बहुधा त्याने तोंडावर बोट ठेवून आपला बदला पूर्ण केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लखनौच्या डगआऊटमध्ये बसून गौतम गंभीर शांतपणे सगळं पाहत होता.

कमी धावसंख्येच्या सामन्यात 18 धावांनी विजय मिळवून आरसीबीने मागील पराभवाचा बदला घेतला. सामना संपल्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू हस्तांदोलन करत होते. यादरम्यान अफगाणिस्तानचा नवीन-उल-हक आणि विराट कोहली यांच्यात वाद सुरू झाला. यानंतर विराट कोहलीला त्याच्या सहकाऱ्यांनी लांब नेले. लखनौच्या इनिंगमध्ये नवीन बॅटिंग करत असताना विराटसोबत त्याची बाचाबाची झाली होती.

विराट कोहली तेव्हा लखनौचा अष्टपैलू खेळाडू काईल मेयर्सशी संवाद साधत होता. तेव्हा गंभीर गेला आणि मेयर्सला घेऊन गेला. दूर जात असताना गौतम गंभीर काहीतरी बोलतांना दिसतो, त्यानंतर विराट कोहलीने गौतम गंभीरला इशारा करून बोलावले आणि त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. अमित मिश्रा आणि विजय दहिया, केएल राहुल, फाफ डुप्लेसिस यांसारखे वरिष्ठ खेळाडू मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु दोघेही लढत होते. दरम्यान, विराट विजय दहियावरही चिडलेला दिसला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Update : अचानक फोनची कॉलिंग स्क्रीन वेगळी दिसतेय? पटकन जाणून घ्या तुमच्या मोबाईलला काय झालंय

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Glycemic Index: मधुमेही खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Crime News: डोळ्यांदेखत पतीवर चाकूचे १६ वार, मला न्याय द्या! कुटुंबावरील हल्ल्यात खून झालेल्या प्रमोदच्या पत्नीची पोलिसांना विनंती

SCROLL FOR NEXT