Ishan Kishan 
क्रीडा

Sa vs Ind Test : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेतून इशान किशनची अचानक माघार, मोठे कारण आले समोर

Kiran Mahanavar

भारतीय क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ यांच्यातील कसोटी मालिकेला 26 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. बीसीसीआयने यासाठी आधीच संघ जाहीर केला होता. पण, यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशनने कसोटी संघातून आपले नाव मागे घेतल्याची मोठी बातमी समोर आली आहे.

एवढेच नाही तर त्यांच्या बदली खेळाडूचीही बोर्डाने तातडीने घोषणा केली आहे. पण आता क्रिकेट चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे. कोणत्या कारणामुळे इशानने कसोटी मालिकेतून आपले नाव मागे घेतले आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनने आगामी दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेतून आपले नाव मागे घेतले आहे. ही माहिती देताना बीसीसीआयने सांगितले की, वैयक्तिक कारणांचा हवाला देत ईशान किशनने बीसीसीआयला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतून माघार घेण्याची विनंती केली. ती मान्य करण्यात आली आहे.

यासोबतच इशान किशनच्या जागी केएस भरतचा संघात समावेश केला आहे. केएस भरतने भारतासाठी 5 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 18.42 च्या सरासरीने 129 धावा केल्या आहेत.

आम्ही तुम्हाला सांगूया, यापूर्वी बीसीसीआयने एक अपडेट दिले होते की वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी पहिल्या कसोटीचा भाग असणार नाही आणि त्या सामन्यात श्रेयस अय्यर टीम इंडियात सामील होईल.

कसोटीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह. (उपकर्णधार), प्रसिध कृष्णा, केएस भरत (यष्टीरक्षक).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

AI आणि रोबोट्समुळे नोकऱ्या धोक्यात! बिल गेट्स यांना चिंता; ‘ह्यूमन रिजर्व्ड’चा फॉर्म्युला सुचवला, आरक्षणाची मागणी

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

शिवीगाळ करणाऱ्याला श्वेता तिवारीने शिकवला धडा; शोधून काढत लेखी माफीनामा घेतला

Numerology: गर्दीतही वेगळी ओळख! इतर लोकांपेक्षा वेगळा विचार का करतात 'या' मूलांकाचे लोक? ट्रेंड फॉलो करत नाहीत...

SCROLL FOR NEXT