

Delhi Capitals | WPL 2026
Sakal
वूमन्स प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील (WPL) एलिमिनेटर सामना गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात बडोद्यात पार पडला. मंगळवारी (३ फेब्रुवारी) झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात जायंट्सला पराभवाचा धक्का देत सलग चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे.
जेमिमाह रोड्रिग्सच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) गुजराजला ७ विकेट्सने पराभूत कले. आता अंतिम सामन्यात गुरुवारी (५ फेब्रुवारी) दिल्ली कॅपिटल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध (RCB) होणार आहे.
स्मृती मानधनाच्या नेतृत्वातील बंगळुरूने गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवत थेट अंतिम सामना गाठला आहे. म्हणजेच आता अंतिम सामना जेमिमा रोड्रि्ग्स विरुद्ध स्मृती मानधना (Jemimah Rodrigues vs Smriti Mandhana) असाही दिसणार आहे.