Junior Athletics Competition
Junior Athletics Competition Sakal
क्रीडा

Junior Athletics Competition : पंधराशे मीटर शर्यतीत लक्षिता शांडिल्यला सुवर्ण

सकाळ वृत्तसेवा

Junior Athletics Competition - नागपूर दक्षिण कोरियातील येचॉन येथे बुधवारी संपलेल्या आशियाई ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धेत शेवटच्या दिवशी भारताच्या लक्षिता शांडिल्यने मुलींच्या पंधराशे मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत भारताने पदकतालिकेत १९ पदकांसह तिसरे स्थान मिळविले.

गुजरातमधील वडोदरा येथील असलेल्या १८ वर्षीय लक्षिताने ४ मिनिटे २४.२३ सेकंदांत पूर्ण केली. ही तिची वैयक्तिक सर्वोत्तम वेळही ठरली. याशिवाय मुलींच्या ४-४०० मीटर रिले संघानेही सुवर्णपदकाला गवसणी घातली. यात महाराष्ट्राच्या अनुष्का कुंभार व रिया पाटीलचा समावेश आहे. याशिवाय कनिस्ता व रेझोना मलिक या अन्य दोन धावपटू होत्या.

या चौकडीने ३ मिनिटे ४०.४९ सेकंद अशी वेळ दिली. अनुष्काचे हे दुसरे पदक ठरले. ४-४०० मिश्र रिले शर्यतीत ब्राँझपदक जिंकणाऱ्या संघातही तिचा समावेश होता. मुलांच्या ४-४०० मीटर रिले संघाला मात्र रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

मुलांच्या पंधराशे मीटर शर्यतीत मेहंदी हसनने ब्राँझपदक जिंकले, तर पाच हजार मीटर शर्यतीत शिवाजी परशूला रौप्यपदक मिळाले. भारतीय खेळाडूंनी सहा सुवर्ण, सात रौप्य व सहा ब्राँझपदके जिंकली व पदकतालिकेत जपान व चीनपाठोपाठ तिसरे स्थान मिळविले. भारताबाहेर झालेल्या स्पर्धेत ही भारतीय संघाची पदकाच्यादृष्टीने सर्वोत्तम कामगिरी होय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT