Kagiso Rabada esakal
क्रीडा

Kagiso Rabada : @50! रोहितचा त्रिफळा उडवत रबाडाने केला मोठा कारनामा

अनिरुद्ध संकपाळ

South Africa vs India 1st Test : दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 408 धावा करत 163 धावांची आघाडी घेतली. यानंतर भारतीय संघाने आपला दुसरा डाव सुरू केला. मात्र कगिसो रडाबाडाने भारताचा म्होरक्या रोहित शर्माचीच दांडी गुल करत टेन्शन वाढवले.

कगिसो रबाडासाठी भारतीय कर्णधाराची विकेट ही खूप खास आहे. या विकेटनंतरच रबाडाने भारताविरूद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 50 विकेट्स पूर्ण केल्या. रोहित हा रबाडाची पन्नासावी शिकार ठरला. रबाडा हा भारताविरूद्ध कसोटीत 50 विकेट्स घेणारा दक्षिण आफ्रिकेचा पाचवा गोलंदाज ठरला आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 10 बाद 408 धावा केल्या. यजमानांनी पहिल्या डावात 163 धावांची मोठी आघाडी घेतली.

मात्र भारताची दुसऱ्या डावात सुरूवात खराब झाला. दुसऱ्याच षटकात रबाडाने रोहित शर्माचा त्रिफळा उडवला. त्यानंतर बर्गरने यशस्वी जयस्वालला 5 धावांवर बाद करत भारताची अवस्था 2 बाद 13 धावा अशी केली. आता भारताचा डाव सावरण्याची जबाबदारी विराट कोहली आणि शुबमन गिलवर आली आहे.

यापूर्वी, भारताविरूद्ध कसोटी क्रिकेटमध्ये डेल स्टेन, मॉर्ने मॉर्कल, एलन डोनाल्ड आणि शॉन पोलॉकने 50 विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता. कगिसो रबाडाने पहिल्या कसोटीत आतापर्यंत 6 विकेट्स घेतल्या आहेत.

कगिसो रबाडाने आतापर्यंत 500 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या आहेत. त्यात त्याने कसोटीमध्ये 4 वेळा पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain News : मुंबईत पहिल्याच पावसाने अनेक ठिकाणी पाणी तुंबले, लोकल सेवेवर परिणाम; पुढील काही तास धोक्याचे, हवामान विभागाचा इशारा

महिलांचे महिला व बालविकास कार्यालयात हेलपाटे! मुख्यमंत्र्यांच्या ‘लाडक्या बहिणीं’ना दरमहा लाभ नाहीच; २१ वर्षे पूर्ण झालेल्या महिलांना करता येईना अर्ज

मोठी बातमी! विद्यार्थ्यांना परीक्षेच्या ३ महिने आधी समजणार वेळापत्रक; विद्यापीठाची पहिली सत्र परीक्षा ऑक्टोबरमध्ये, द्वितीय सत्र परीक्षा मार्चअखेर

विशेष : शब्दांपासून आकर्षक आकृतीपर्यंत

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

SCROLL FOR NEXT