Darshan Patil esakal
क्रीडा

Darshan Patil : कोल्हापूरचा फुटबॉलपटू दर्शन पाटीलनं मैदान मारलं; युरोपियन लीगमध्ये खेळणारा ठरला महाराष्ट्राचा पहिला खेळाडू

अनिरुद्ध संकपाळ

Darshan Patil Club SV Gmunden Austria : कोल्हापूरने फुटबॉल जगतात महाराष्ट्राची मान उंचावण्याचं काम सातत्यानं केलं आहे. त्याच कोल्हापुरातील 18 वर्षाच्या दर्शन पाटीलने शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला आहे. करवीर तालुक्यातील दर्शन पाटील हा प्रतिष्ठेच्या युरोपियन लीगमध्ये खेळणारा महाराष्ट्राचा पहिला फुटबॉलपटू ठरला आहे. त्याची ऑस्ट्रियामधील SV Gmunden फुटबॉल क्लबकडून खेळण्यासाठी निवड झाली आहे.

दर्शन पाटील आता येत्या युरोपियन लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. दर्शनसह नेदरलँड्समधील वर्मन याची देखील या क्बलकडून खेळण्याची निवडला गेला आहे. दर्शन पाटील हा कोल्हापुरात देवकर पानंद येथे राहतो. त्याने मामाच्या पावलावर पाऊल ठेवत फुटबॉल खेळण्यास सुरूवात केली. तो दिल्लीत झालेल्या 14 वर्षाखालील नॅशनल स्पर्धा देखील खेळला आहे. याचबरोबर तो 19 वर्षाखालील नॅशनल स्पर्धेत देखील खेळला होता. घरच्यांनी त्याला फुटबॉल सोबतच अभ्यासाकडे देखील लक्ष देण्यास सांगितले.

एक फोन आला अन्...

दर्शनला प्रशिक्षक प्रदीप साळोखे आणि धीरज मिश्रा यांनी फोन करून महराष्ट्रात SV Gmunden ची सिलेक्शन ट्रायल होणार असल्यांच सांगितलं. पुण्यातील बालेवाडी येथे ही चाचणी पार पडली. या चाचण्यासाठी भरपूर खेळाडू आले होते. त्यातील फक्त 5 खेळाडूंची निवड झाली. यात दर्शनचा देखील समावेश होता.

निवडीबाबत दर्शन म्हणाला की, मी ट्रायलवेळी माझं नाव आणि पत्ता दिला होता. त्यावेळी माझी निवड झाली आहे की नाही याची मला काहीच कल्पना नव्हती. मात्र मला माझ्या प्रशिक्षकांचा फोन आला अन् त्यांनी माझी निवड झाल्यांच सांगितलं. मी उत्साहाने पासपोर्ट काढला.

मात्र त्यांच्याकडून दीड महिना झाला तरी अधिकृतरित्या कोणताच फोन आला नाही. मला वाटलं की हे सगळं फेक आहे. मात्र कौशिक सरांचा फोन आला अन् त्यांनी मुंबईला बोलवून घेतलं. मला वानखेडे स्टेडियमवर जर्सी देण्यात आली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

योजनांना पात्र, तरीही कर्ज मिळेना; उपचाराअभावी मुलगा गमावला, चित्रकार मंत्रालयासमोर करणार 'अर्ध नग्न लक्षवेधी चित्र' आंदोलन

Latest Marathi News Live Update : पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज; उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता

Coldrif Syrup : मध्य प्रदेश-राजस्थानमध्ये मृत्यूंनंतर 'कोल्ड्रिफ सिरप'वर महाराष्ट्रात बंदी

Raju Shetti:'अन्यथा मुख्यमंत्र्यांना दिवाळी करू देणार नाही': माजी खासदार राजू शेट्टी; शेतकऱ्यांवर गंभीर संकट, मुख्यमंत्र्यांकडून दिशाभूल

SCROLL FOR NEXT