lionel messi back as 2026 football world cup qualifiers kick off
lionel messi back as 2026 football world cup qualifiers kick off Sakal
क्रीडा

Lionel Messi : लिओनेल मेस्सी पुन्हा अर्जेंटिनाच्या सेवेत; वर्ल्डकप पात्रता फेरी आजपासून

सकाळ वृत्तसेवा

ब्यूनस एअर्स (अर्जेंटिना) : दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी पुन्हा एकदा अर्जेंटिनाच्या सेवेसाठी दाखल झाला आहे. २०२६ मध्ये होत असलेल्या फुटबॉल विश्‍वकरंडकाच्या पात्रता फेरीला उद्यापासून सुरुवात होत आहे. अर्जेंटिनाचा फुटबॉल संघ घरच्या मैदानावर होणार असलेल्या लढतीत इक्वेडोरशी दोन हात करणार आहे.

मागील वर्षी (२०२२) विश्‍वकरंडकाच्या अंतिम फेरीत फ्रान्सला हरवून अर्जेंटिनाने १९८६ नंतर विजेतेपदावर मोहोर उमटवली. मेस्सीच्या नेतृत्वात अर्जेंटिनाला हा करिष्मा करता आला. त्यानंतर अर्जेंटिनाचा संघ या वर्षी चार मैत्रीपूर्ण सामने खेळला. अर्जेंटिनाच्या संघाने मैत्रीपूर्ण सामन्यांमध्ये पनामा, कुराकाओ, ऑस्ट्रेलिया व इंडोनेशिया या चारही देशांना पराभूत केले. अर्जेंटिनाचा संघ पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय व्यावसायिक लढत उद्या खेळणार आहे.

मेस्सी याने इंटर मियामी या क्लबशी जोडल्यानंतर त्यांच्यासाठी मोलाची कामगिरी बजावली. मेस्सीच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर इंटर मियामी क्लबने लीग करंडकाच्या अजिंक्यपदावर अगदी रुबाबात मोहोर उमटवली. आता क्लब फुटबॉलमध्ये देदीप्यमान यश मिळवल्यानंतर मेस्सी पुन्हा एकदा देशासाठी खेळताना दिसणार आहे.

निवृत्तीच्या निर्णयाबद्दल अनिश्‍चिता

लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वात अर्जेंटिनाने विश्‍वकरंडक पटकावल्यानंतर तो निवृत्त होईल अशी चर्चा रंगू लागली होती; मात्र मेस्सीने याला नकार दिला. जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, फुटबॉलविश्‍वात सर्व काही मिळवले आहे.

आता त्याचा आनंद घ्यावयाचा आहे. वय वाढत चालले आहे. त्यामुळे साहजिकच लवकरच निवृत्तीचा निर्णय घेतला जाईल असे म्हटले जाते; मात्र सध्या तरी निवृत्तीचा निर्णय केव्हा घेईन, हे मला सांगता येणार नाही. दरम्यान, मेस्सीच्या वक्तव्यामुळे निवृत्तीबद्दल सध्या तरी अनिश्‍चितता आहे.

त्याच्यासाठी दरवाजे उघडे ः स्कॅलोनी

अर्जेंटिना फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक लिओनेल स्कॅलोनी यांनी म्हटले, की लिओनेल मेस्सी हा अर्जेंटिनाचा प्रमुख खेळाडू आहे. तो २०२६ मधील विश्‍वकरंडकही खेळू शकतो. त्याच्यासाठी नेहमीच दरवाजे उघडे असतील. आता त्याच्या मनावर आहे. त्याला वाटले की मला पुन्हा मैदानात उतरावयाचे आहे, तर तो संघात कायम राहू शकतो, असे त्यांनी पुढे नमूद केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT