Rapid and Blitz 2024  sakal
क्रीडा

Rapid and Blitz 2024 : मॅग्नस कार्लसन विजेता! डी. गुकेश अखेरच्या स्थानी

जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसन याने सुपरबेट जलद व ब्लिटझ्‌ बुद्धिबळ स्पर्धेत विजेता होण्याचा मान संपादन केला. त्याने एकूण २६ गुणांची कमाई करताना जेतेपदावर मोहर उमटवली.

सकाळ वृत्तसेवा

वॉरसॉ (पोलंड) : जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसन याने सुपरबेट जलद व ब्लिटझ्‌ बुद्धिबळ स्पर्धेत विजेता होण्याचा मान संपादन केला. त्याने एकूण २६ गुणांची कमाई करताना जेतेपदावर मोहर उमटवली. वेई यी याला २५.५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. जॅन डुडा तिसऱ्या स्थानावर राहिला.

मॅग्नस कार्लसन व वेई यी यांच्यामध्ये अखेरच्या दिवशी अडीच गुणांचा फरक होता. हा फरक भरून काढून अजिंक्यपद मिळवणे कठीण काम होते; पण दिग्गज खेळाडू कार्लसन याने एकूण २६ गुणांची कमाई करताना विजेतेपदाला गवसणी घातली. त्याने वेई यी याच्यावर अर्ध्या गुणाने विजय साकारला. कार्लसन या स्पर्धेत इतर नऊ खेळाडूंवर मात केली हे विशेष.

प्रज्ञानंद चौथ्या स्थानी

भारताच्या तीन खेळाडूंचा या स्पर्धेत सहभाग होता. आर. प्रज्ञानंद याने १९ गुणांसह चौथे स्थान पटकावले. अर्जुन इरिगेसी १८ गुणांसह पाचव्या स्थानावर राहिला; पण आव्हानवीरांच्या बुद्धिबळ स्पर्धेत विजयी ठरलेल्या डी. गुकेशची या स्पर्धेमध्ये घसरण झाली. त्याला १२.५ गुणांसह अखेरच्या दहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

सुपरबेट बुद्धिबळ स्पर्धेतील क्रमवारी

१) मॅग्नस कार्लसन (२६ गुण) २) वेई यी (२५.५ गुण) ३) जॅन डुडा (१९.५) ४) आर. प्रज्ञानंद (१९ गुण) ५) अर्जुन इरिगेसी (१८ गुण) ६) नोदीरबेक अब्दुसत्तोरोव (१७.५ गुण) ७) किरील शेवचेंको (१५ गुण) ८) अनिश गिरी (१४ गुण) ९) विनसेंट केमर (१३ गुण) १०) डी. गुकेश (१२.५ गुण).

प्रज्ञानंद, हम्पी, वैशालीवर भारताची मदार

नॉर्वे बुद्धिबळ ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. ही स्पर्धा येत्या २७ मे ते ७ जून या कालावधीत रंगणार आहे. या स्पर्धेमध्ये भारतीय संघाची मदार आर. प्रज्ञानंद, कोनेरु हम्पी व आर. वैशाली या खेळाडूंवर असणार आहे. या स्पर्धेतील पुरुष विभागात प्रज्ञानंदच्या रूपात भारताचा एकमेव खेळाडू सहभागी होणार आहे. या स्पर्धेत मॅग्नस कार्लसन, हिकारु नाकामुरा व सध्याचा जगज्जेता डिंग लिरेन यांचाही सहभाग असणार आहे. त्यामुळे प्रज्ञानंदचा कस लागेल, हे निश्‍चित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: मराठीत बोललो तर माध्यम माझी भावना सर्व महाराष्ट्रातील लोकांना लाईव्ह दाखवतील - फडणवीस

Thane Politics: मराठीचा मुद्दा चिघळला; मनसे महिला पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

M Phil Professors : १४२१ प्राध्यापकांना मिळाला दिलासा! एम. फिल धारक प्राध्यापकांना अखेर नेट/सेटमधून सूट

SCROLL FOR NEXT