
ठाणे : शहरासह विविध ठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांमुळे मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील हरित पट्टा हरवत असल्याची टीका पर्यावरणप्रेमींकडून पालिकेवर होत आहे. त्यामुळे शहरातील पर्यावरणाचा समतोल टिकवण्यासाठी महामार्गांच्या कडेला तसेच दुभाजकांमध्ये बांबूची लागवड करण्याचा निर्णय वृक्ष प्राधिकरण विभागाने घेतला आहे.