Asia Cup 2022
Asia Cup 2022 sakal
क्रीडा

Asia Cup 2022 : शमी, सॅमसन आणि इशान बाहेर मात्र 'या' फ्लॉप खेळाडूला संधी

Kiran Mahanavar

Asia Cup 2022 India Squad : आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील 15 जणांचा संघ आशिया कप जिंकण्यासाठी मैदानात उतरले. टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाची मानली जात आहे. अशा परिस्थितीत सर्वांच्या नजर संघ निवडीकडे लागल्या होत्या. संघात सतत फ्लॉप होत असलेल्या आवेश खानला संधी देण्यात आली आहे. आवेशने या वर्षात 13 टी-20 सामने खेळले आहेत आणि 32 च्या सरासरीने फक्त 11 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर संघात निवड होण्यास पात्र असलेले अनेक खेळाडू होते, पण त्यांना संधी मिळाली नाही.

Mohammed Shami

आशिया चषक स्पर्धेत जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे टीम इंडियाचा भाग होऊ शकला नाही. अशा परिस्थितीत मोहम्मद शमीच्या रूपात अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारसोबत सलामीच्या स्पेलमध्ये असणे टीम इंडियासाठी फायदेशीर ठरले असते. टीम इंडियाच्या संघात भुवनेश्वर व्यतिरिक्त अर्शदीप सिंग आणि आवेश खान हे एकमेव स्पेशलिस्ट वेगवान गोलंदाज आहेत. मात्र, दोघांनाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा फारसा अनुभव नाही.

ishan kishan

आशिया चषक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या 15 सदस्यीय भारतीय संघात इशान किशनचा समावेश नाही. आयपीएलनंतर त्याला सतत टी-20 संघात संधी मिळत होती आणि अचानक त्याला वगळण्यात आले. इशान त्याच्या बॅटनेही चांगली कामगिरी करत होता. यावर्षी या धडाकेबाज फलंदाजाने 14 टी-20 सामने खेळून 430 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 89 धावा आहे. त्याने 3 अर्धशतकांसह 130.30 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत.

sanju samson

संजू सॅमसन हा भारतातील सर्वात प्रतिभावान खेळाडूंपैकी एक आहे. संजूने 2013 ते 2022 पर्यंत आयपीएलच्या 138 सामन्यांमध्ये 3,526 धावा केल्या आहेत. असे असूनही, संजूला भारतासाठी केवळ 4 वनडे आणि 16 टी-20 सामने खेळण्याची संधी मिळाली. केवळ बदली खेळाडू म्हणून संजूची संघात अधिक निवड करण्यात आली आहे. एका मालिकेत तो संघाचा भाग असतो, त्यानंतर पुढच्या मालिकेत त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT