ms dhonis old prediction on Ravindra jadeja
ms dhonis old prediction on Ravindra jadeja  Sakal
क्रीडा

जडेजासंदर्भातील धोनीची ती भविष्यवाणी होतेय व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू रविंद्र जडेजा सध्या क्रिकेटच्या मैदानात कमालीची कामगिरी करताना दिसतो आहे. मोहाली कसोटीत बॅटिंग-बॉलिंगमध्ये धमाकेदार कामगिरी करत त्याने आयसीसी वर्ल्ड टेस्ट रँकिंगमध्ये अव्वलस्थान पटकावले आहे. या गोष्टीपेक्षा रविंद्र जडेजा सध्या धोनीने केलेल्या भविष्यवाणीमुळे चर्चेत आहे.

2010 मध्ये भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं 21 वर्षीय रविंद्र जडेजाशिवाय भविष्यवाणी केली होती. भारतीय संघाला ज्या अष्टपैलू खेळाडूची गरज आहे ती उणीव भरुन काढण्याची धमक जडेजामध्ये आहे, असे तो म्हणाला होता. ज्यावेळी जडेजाने फार क्रिकेट खेळले नव्हते त्यावेळी धोनीनं तो भविष्यात स्टार असेल, असे भाकित केले होते. त्याची ही भविष्यवाणी आजच्या घडीला खरी ठरलीये. तो तिन्ही क्रिकेट प्रकारात भारतीय संघासाठी उपयुक्त खेळाडू ठरत आहे.

भारतीय संघाशिवाय रविंद्र जडेजा बऱ्याच कालावधीपासून धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो. धोनीच्या सांगण्यावरुनच चेन्नई सुपर किंग्जेने यंदाच्या हंगामातील मेगा लिलावापूर्वी रविंद्र जडेजाला धोनीपेक्षा अधिक महत्त्व दिले. त्याच्यासाठी जी अधिक रक्कम मोजलीये यातून तो धोनीचा वारसदार असल्याचे संकेतच चेन्नईने दिले आहेत.

दुखापतीमुळे गेल्या काही मालिकेला मुकलेल्या रविंद्र जडेजाने मोहाली कसोटीत तोऱ्यात कमबॅक केले. त्याने 175 धावांची नाबाद खेळी केल्यानंतर 9 विकेट्स घेत भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. डे नाईट कसोटी सामन्यातही त्याच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा असतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

SRH vs PBKS Live Score : हैदराबादचा डोळा दुसऱ्या क्रमांकावर; पंजाबचा नवा कर्णधार शेवट गोड करण्यासाठी उत्सुक

Anil Kapoor : "सहजीवनाची 51 वर्षं..."; लग्नाच्या वाढदिवसाला अनिल यांची पत्नीसाठी इमोशनल पोस्ट

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

SCROLL FOR NEXT