DRS चा ड्रामा! अंपायर बॉल मोजायला चुकला

  womens world cup 2022
womens world cup 2022

न्यूझीलंडच्या मैदानात आयसीसी महिला वर्ल्ड कप स्पर्धा सुरु आहे. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात अंपायरकडून मोठी चूक झाल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे मैदानातील खेळाडूंनाही ती गोष्ट लक्षात आली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तान महिला संघाला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे स्पर्धेतील त्यांचा मार्ग हळूहळू बंद होताना दिसतोय.

दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 27 व्या षटकात एका ओव्हरमध्ये सहा चेंडू एवजी सात चेंडू फेकण्यात आले. ही गोष्ट न अंपायरच्या लक्षात आली ना पाकिस्तानी महिला खेळाडूंच्या लक्षात आलं. पाकिस्तानकडून ओमैमा सोहेल गोलंदाजी करत होती. तिने या षटकात सात चेंडू फेकले.

  womens world cup 2022
VIDEO: शेन वॉर्नने स्तुती केलेल्या शाहिदला लाभला क्रिकेटच्या देवाचा स्पर्श

या षटकात चांगलाच ड्रामा पाहायला मिळाला. षटकातील शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानी महिलांनी सुने लुस हिच्या विरुद्ध LBW ची जोरदार अपील केली. मैदानातील पंचांनी तिला आउटही दिले. सुने लुसनं रिव्ह्यू घेत अंपायरचा निर्णय पलटला. दक्षिण आफ्रिकेचा दुसरा रिव्हूय यशस्वी ठरला. या सर्व प्रकारात अंपाय तो शेवचा चेंडू होता हे विसरुन गेले. परिणामी एका ओव्हरमध्ये 7 चेंडू फेकले गेले.

  womens world cup 2022
VIDEO: शेन वॉर्नने स्तुती केलेल्या शाहिदला लाभला क्रिकेटच्या देवाचा स्पर्श

दक्षिण आफ्रिका संघाने निर्धारित 50 षटकात 9 विकेट्सच्या मोबदल्यात 223 धावा केल्या होत्या. पाकिस्तान महिला संघाने एक चेंडू अवांतर टाकलाच शिवाय चार कॅचही सोडले. पाकिस्तान महिला संघाने मॅच शेवटच्या षटकापर्यंत नेली. पण त्यांना स्पर्धेतील पहिला विजय काही मिळालाच नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com