क्रीडा

मुंबईचे आंध्र संघावर वर्चस्व ; रणजी क्रिकेट करंडक

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : तळाच्या फलंदाजांनी केलेल्या प्रतिकारामुळे मुंबईने ३९५ धावांपर्यंत मजल मारली आणि रणजी करंडक क्रिकेट सामन्यात त्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर आंध्र प्रदेशचे तीन फलंदाज ९८ धावांत बाद केले.

६ बाद २२४ अशा अवस्थेनंतर ३९५ ही धावसंख्या मुंबई संघाला निश्चितच सुखावणारी आहे. दिवसअखेर आंध्र प्रदेशचे तीन फलंदाज बाद करून त्यांनी सामन्यावर पकड कायम ठेवली आहे. आंध्रचा हुकमी फलंदाज माजी कसोटीवीर हनुमा विहारीला अवघ्या सहा धावांवर बाद करण्यात मुंबईला यश मिळाले.

फलंदाजीत ३८ धावा करणाऱ्या शम्स मुलानीने दोन विकेटही मिळवल्या. आंध्र प्रदेशला गणेश्वर आणि प्रशांत कुमार यांनी ५७ धावांची सलामी दिली. रॉस्टन डायसने गणेश्वरला बाद केल्यानंतर मुलानीने शैक रशीद आणि विहारी यांना पाठोपाठ माघारी धाडले. तत्पूर्वी आज ६ बाद २८१ धावांवरून मुंबईच्या पुढच्या फलंदाजांनी ११४ धावा जोडल्या. तनुष कोटियन आणि मोहित अवस्थी यांची अर्धशतकी खेळी महत्त्वाची ठरली. प्रथम तनुष आणि शम्स मुलानी यांनी सातव्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली; परंतु हे दोघेही फलंदाज एका धावेच्या फरकाने बाद झाले.

संक्षिप्त धावफलक ः मुंबई, पहिला डाव ः ३९५ (जय बिस्ता ३९, भुपेन लालवानी ६१, सुवेद पारकर ४१, श्रेयस अय्यर ४८, शम्स मुलानी ३८, तनुष कोटियन ५४, मोहित अवस्थी ५३, धवल कुलकर्णी नाबाद २४, ललित मोहन ४३-७-८९-२, नितीश कुमार रेड्डी २४.४-४-६४-५, शोएब मोहम्मद खान २०-१-७१-२). आंध्र प्रदेश, पहिला डाव ः ३ बाद ९८ ( प्रशांत कुमार खेळत आहे ५९, शम्स मुलानी १२-०-३५-२)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT