Nikhat Zareen sakal
क्रीडा

CWG 2022 : निखत जरीनने मारला गोल्डन पंच; भारताच्या पदरात सतरावे सुवर्णपदक

निखतच्या आधी, अमित पंघल आणि नीतू यांनी फायनल जिंकून भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.

Kiran Mahanavar

Commonwealth Games 2022 Boxing Nikhat Zareen : बॉक्सिंगमध्ये भारताला आणखी एक यश मिळाले आहे. देशाची महिला बॉक्सर आणि विश्वविजेती निखत जरीनने रविवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. निखतने 51 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत उत्तर आयर्लंडच्या कॅरी मॅकनॉलचा 5-0 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. राष्ट्रकुल 2022 मधील भारताचे हे 48 वे आणि बॉक्सिंगमधील तिसरे सुवर्णपदक आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत निखतने प्रथमच भारताला पदक मिळवून दिले आहे.

पहिल्या राऊंडमध्ये निखतने वर्चस्व गाजवले. सर्व 5 पंचांकडून तिने 10 पैकी 10 गुण घेतले. दुसऱ्या राऊंडमध्ये ही निकाल निखतच्या बाजूनेच होता. तिसऱ्या राऊंडमध्ये तिने सातत्य राखत सुवर्णपदकावर आपली पकड मजबूत केली. निखतने तिच्यापेक्षा 7 वर्ष वयाने मोठ्या असलेल्या खेळाडूला थकवून बाजी मारली. 51 किलो वजनी गटात मेरी कोमने कधीकाळी वर्चस्व गाजवले होते.

कॉमनवेल्थ गेम्स 2022 चा आज 10 वा दिवस आहे. आज बॉक्सिंगमध्ये नीतू, अमितनंतर निकतनेही सुवर्णपदक जिंकले आहे. भारताच्या कामगिरीवर नजर टाकली तर 17 सुवर्ण, 12 रौप्य आणि 19 कांस्य अशी एकूण 48 पदके जिंकली आहेत.

भारताची पदकसंख्या : 48

  • 17 सुवर्ण : मीराबाई चानू, जेरेमी लालरिगुंना, अंचिता शेऊली, महिला लॉन बॉल्स संघ, टेबल टेनिस पुरूष संघ, सुधीर (पॅरा वेटलिफ्टिंग), साक्षी मलिक, बजरंग पुनिया, दीपक पुनिया, रवी कुमार दहिया, विनेश फोगाट, नवीन, भाविना (पैरा टेबल टेनिस), नीतू घनघास, अमित पंघाल, एल्डहॉस पॉल, निखत जरीन.

  • 12 रौप्य : संकेत सरगर, बिंदियाराणी देवी, सुशिला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंजू मलिक, प्रियांका गोस्वामी, अविनाश साबळे, पुरूष लॉन बॉल्स संघ, अब्दुल्ला अबोबैकर.

  • 19 कांस्य : गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंग, लवप्रीत सिंह, गुरदीप सिंग, तेजस्वीन शंकर, दिव्या काकरन, मोहित ग्रेवाल, जस्मिन, पूजा गेहलोत, पूजा सिहाग, मोहम्मद हुसामुद्दीन, दीपक नेहरा, रोहित टोकस, महिला हॉकी संघ, सौरव घोषाल, संदीप कुमार, अन्नू रानी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

४०० धावांचा विक्रम का मोडला नाही? Wiaan Mulderने सांगितली मन जिंकणारी गोष्ट; म्हणाला, ब्रायन लारा..

Latest Maharashtra News Updates : एलबीएस मार्गावरील वाहतूक कोंडीने चाकरमान्यांचे हाल

Mobile Recharge : मोबाईल वापरकर्त्यांना झटका! रिचार्जचे दर 10-12% ने पुन्हा महागणार, कोणत्या कंपनीचे किती पैसे? जाणून घ्या..

11th Admission : इ. ११ वी प्रवेशाची दुसरी फेरी सुरू; पसंतीक्रम लॉक करण्यासाठी १० ते १३ जुलैची मुदत

'त्या जागी जाऊन पुन्हा तुमची आठवण आली' तेजश्रीने बसस्टॉपवरचे फोटो केले शेअर, नेटकरी म्हणाले...'यावेळी तरी अर्ध्यात मालिका सोडू नको'

SCROLL FOR NEXT