pakistan cricket board chief Najam Sethi sakal
क्रीडा

पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ! आफ्रिदी सापडला भ्रष्टाचारात, PCB ने घातली बंदी

पाकिस्तानी खेळाडूवर अशाप्रकारे बंदी घालण्याची ही पहिलीच वेळ नाही आधी...

Kiran Mahanavar

Pakistan Cricket Board : पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. भ्रष्टाचार प्रकरणी आणखी एका पाकिस्तानी खेळाडूवर बंदी घालण्यात आली आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून पाकिस्तान संघाचा डावखुरा फिरकीपटू आसिफ आफ्रिदी आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचार विरोधी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोन वर्षांची बंदी घालण्यात आली. या खेळाडूवर ही बंदी 22 सप्टेंबर 2022 पासून सुरू झाली आहे, जेव्हा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर तात्पुरती बंदी घातली होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एक निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली.

आसिफ आफ्रिदीला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये राष्ट्रीय टी-20 स्पर्धेदरम्यान भ्रष्टाचार केला का नाही हा अहवाल देण्यास अयशस्वी झाल्यामुळे निलंबित करण्यात आले होते. निर्णय जाहीर करताना पीसीबीने सांगितले की, आफ्रिदीने आपल्या प्रकरणाला सहानुभूतीने वागवण्याची विनंती केली होती. त्यांनी अनवधानाने संहितेचे उल्लंघन केल्याचा दावा केला.

आफ्रिदीची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या T20I मालिकेसाठी पाकिस्तानच्या संघात निवड करण्यात आली होती पण त्याला राष्ट्रीय संघाकडून एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. आसिफने 35 प्रथम श्रेणी सामन्यात 118 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय शतकाच्या जोरावर 1303 धावाही केल्या आहेत. त्याच्या नावावर लिस्ट ए मध्ये 59 विकेट्स आहेत. आफ्रिदी पीएसएलमध्ये मुलतान सुलतानचा भाग आहे. त्याने 63 टी-20 सामन्यात 63 विकेट्स घेतल्या आहेत.

पाकिस्तानी खेळाडूवर अशाप्रकारे बंदी घालण्याची ही पहिलीच वेळ नाही. फिक्सिंगमुळे देशातील अनेक बड्या खेळाडूंना बंदीचा सामना करावा लागला आहे. यामध्ये माजी कर्णधार सलमान बट, वेगवान गोलंदाज मोहम्मद आसिफ, मोहम्मद अमीर आणि सलीम मलिक या नावांचा समावेश आहे. वसीम अक्रम आणि वकार युनूससारखे दिग्गज खेळाडूही मॅच फिक्सिंगमध्ये सामील होते. वसीमला कर्णधारपदावरून पायउतार व्हावे लागले पण खेळत राहिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : मुंबईत दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरुच, रायगड, पालघरमध्ये शाळांना सुट्टी; रेड अलर्ट जारी, पुढील ४ दिवस धोक्याचे

पोलिस उपायुक्तांचे आदेश! ट्रॅफिक पोलिस नेमलेल्या ठिकाणीच असणे बंधनकारक; ‘HSRP’ नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर ‘आरटीओ’ करणार कारवाई; रिक्षा चालकांना ड्रेसकोडचे बंधन

चोरीचे दागिने घेणारा सराफही आरोपी! पावतीशिवाय दागिने घेतल्यास पोलिसांकडून कारवाई; ‘या’ कलमाखाली 3 वर्षांपर्यंत कारावास अन्‌ दंडाची शिक्षा, वाचा...

जिल्हा परिषदेच्या भन्नाट योजना! महिलांना शिलाई मशीन, पिठाची गिरणी; सातवी ते बारावीतील मुलींना सायकली, टॅली, MS-CIT, कराटे प्रशिक्षण, गरीब मुलांना पैसेही

Best Banana French Toast: बिझी मॉर्निंगसाठी बेस्ट! 10 मिनिटांत बनवा बनाना फ्रेंच टोस्ट; लिहून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT