Asia Cup
Asia Cup sakal
क्रीडा

Asia Cup : गरीब पाकिस्तान! म्हणे विमान प्रवासाचा खर्च द्या... जय शहांच्या अध्यक्षतेखालील ACC म्हणतं वाट बघा

Kiran Mahanavar

आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेचे गमावलेले पूर्ण यजमानपद, त्यानंतर प्रत्यक्ष स्पर्धेत संघाला तळाच्या स्थानावर झालेली घसरण, अशी नाचक्की झालेल्या पाकिस्तान क्रिकेट मंडळाची हाव काही सुटेना. पण जय शहा अध्यक्ष असलेली आशिया क्रिकेट परिषद त्यांना दाद देईना...स्पर्धा संपून दोन महिने झाले तरी या दोघांमधला वाद संपलेला नाही.

स्पर्धेतील नऊपैकी केवळ तीन सामने पाकमध्ये झाले तर उर्वरित सामने श्रीलंकेत पार पडले. आपल्या खेळाडूंनी पाकिस्तान ते श्रीलंका प्रवास केला त्यासाठी झालेला खाजगी विमानाचा खर्च आम्हाला द्यावा अशी मागणी पाक मंडळाने केली, परंतु अपेक्षेप्रमाणे आशियाई क्रिकेट परिषदेने ती धुडकावली.

आशिया क्रिकेट स्पर्धेचे मुळ यममानपद पाककडे होते, परंतु भारताने तेथे खेळण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर हायब्रिड मॉडेलचा प्रस्ताव पुढे आला. पण जय शहा अध्यक्ष असलेल्या आशियाई क्रिकेट परिषदेने त्यातील तीनच सामने पाकला दिले होते.

या स्पर्धेच्या यजमानपदाची २ लाख ५० हजार डॉलर फी तसेच प्रायोजकांकडून मिळणारा आणि तिकिट विक्रीचा हिस्सा यासह आणखी अतिरिक्त निधी आपल्याला मिळायला हवा अशी मागणी पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून करण्यात येत आहे.

पाकिस्तान ते श्रीलंका या प्रवासासाठी चार्टड फ्लाईटचा खर्च तसेच हॉटेल निवास, इतर प्रवास हा खर्च आम्ही प्राथमिक अंदाज प्रत्रकात नमुद केला नव्हता तो आम्हाला द्यावा असे पीसीबीचे म्हणणे आहे. पण त्यांची ही मागणी आशिया क्रिकेट परिषदेने (एसीसी) धुडकावली. हायब्रीड मॉडेलनुसार श्रीलंकेत सामने खेळण्यास तुम्ही मंजुरी दिली होती, मग तुम्हाला अतिरिक्त निधी देण्याचा प्रश्नच येत नाही, असे एसीसीने स्पष्ट केले.

पाकिस्तान ते श्रीलंका या चार्टर्ड विमान प्रवासासाठी पीसीबीने श्रीलंकन कंपनीला २ लाख ८१ हजार डॉलर खर्च केले. ही रक्कम तुम्ही अगाऊ द्यायला नको होती असे पीसीबीच्या क्रिकेट व्यवस्थापन समितीने म्हटले आहे, परंतू पूर्ण रक्कम अगाऊ मिळाल्याशिवाय आम्ही विमान पाठवणार नाही, असे भूमिका विमानकंपनीने घेतली होती.

आशियाई क्रिकेट परिषदेने काही सामने श्रीलंकेत खेळवण्याचा निर्णय घेतला तर आम्हाला लागलेला चार्टर्ड विमानप्रवासाचा अतिरिक्त खर्च त्यांनी आम्हाला द्यायला हवा, असे दावा पीसीबी करत आहे. या प्रवासासाठी चार चार्टर्ड विमान वापरण्यात आली, परंतु त्यातील एका विमानाने खेळाडू आणि पदाधिकाऱ्यांच्या कुटूंबियांनी प्रवास केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Iran Helicopter Crash : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या 'बेल 212' हेलिकॉप्टरमुळे अनेकांनी गमावलाय जीव ; जोडलं जातंय अमेरिकेच नाव

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

SCROLL FOR NEXT