Rajat Patidar News
Rajat Patidar News esakal
क्रीडा

हॉटेल बुक होतं तारीख ठरली होती अन् RCB ने सांगावा धाडला

धनश्री ओतारी

गेल्या दोन दिवसांपासून आरसीबीचा युवा खेळाडू रजत पाटीदार चांगलाच चर्चेत आला आहे. त्याने लखनौविरुद्ध 49 बॉलमध्ये ११२ धावा ठोकत शतक पूर्ण केले. इतकेच नव्हे तर त्याच्या नावांवर अनेक विक्रमांची नोंददेखील झाली आहे. त्यामुळे क्रिकेट जगतात त्याच्या नावाचा गवगवा होताना दिसत आहे. अशातच त्याच्या खासगी आयुष्यातील एक गोष्ट समोर आली आहे. आरसीबीने खेळण्यासाठी त्याला कॉल केला नसता तर तो लग्नबंधनात अडकला असता. (Rajat Patidar Wedding Updates)

रजतचे वडील मनोहर पाटीदार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “रजतचे लग्न ९ मे रोजी रतलाम येथील मुलीशी होणार होते आणि त्यासाठी आम्ही इंदूरमध्ये हॉटेलही बुक केले होते. पण आरसीबीकडून आयपीएल खेळण्यासाठी निमंत्रण आल्यानंतर लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आली.

त्यामुळं कुटुंब रजतच्या लग्नासाठी जुलैचा शुभ मुहूर्त पाहत आहेत. परंतु पावसाळ्याच्या हंगामामुळे लग्न समारंभ पूर्वीपेक्षा मर्यादित स्वरूपात आयोजित केला जाण्याची शक्यता आहे. अशी माहिती रजतच्या वडीलांनी दिली.

खरतरं रजत लिलावात अनसोल्ड ठरला होता. त्याला खरेदी करायला कोणीही तयार नव्हंत. पण संधी मिळताच रजतने त्याच सोनं केलं. एलिमिनेटर सामन्यात धडाकेबाज खेळी करणारा रजत मुळचा इंदौरचा आहे. त्याचा जन्म १ जून १९९३ मध्ये झाला. वयाच्या ८ व्या वर्षी त्याने मैदानात पहिले पाऊल ठेवलं होत.

आरसीबीने लिलावात विकत घेतलेल्या लवनिथ सिसोदियाला दुखापत झाली, यानंतर आरसीबीचे डायरेक्टर ऑफ क्रिकेट माईक हेसन यांनी पाटीदारला फोन केला आणि बॅग पॅक करून आरसीबीच्या टीममध्ये यायला सांगितलं. पाटीदारला आरसीबीने 20 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर विकत घेतलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT