PM Narendra Modi Met Indian Team Praised Rohit Sharma Virat Kohli And Rahul Dravid Video sakal
क्रीडा

PM Modi Video: टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधील पंतप्रधानांचा 'तो' पहिला व्हिडिओ आला समोर, बूमराहला काय म्हणाले मोदी?

सकाळ ऑनलाईन टीम

PM Modi Video : विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम स्पर्धेत भारतीय संघाला रविवारी रात्री ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे भारतीय संघ निराश झाला होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ड्रेसिंग रूममध्ये जाऊन खेळाडूंना धीर दिला.

विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा गडी राखून पराभव केला. अंतिम सामना पाहण्यासाठी पंतप्रधान मोदी अहमदाबादला गेले होते. सामन्याच्या उत्तरार्धात ते स्टेडियमवर पोहोचले. मोदींनी ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्स यांच्यासमवेत पॅट कमिन्स याच्याकडे विश्वकरंडक सुपूर्द केला.

या पराभवामुळे कर्णधार रोहित शर्मासह सर्व खेळाडू निराश झाले होते. काहींना भावना अनावर झाल्या होत्या. पुरस्कार वितरण समारंभानंतर भारतीय खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्यांच्यानंतर ड्रेसिंगरूममध्ये दाखल झाले आणि त्यांनी सर्व खेळाडूंना धीर दिला, त्याचबरोबर स्पर्धेत केलेल्या दिमाखदार कामगिरीचे कौतुकही केले. मोहम्मद शमीला जवळ घेत त्यालाही धीर दिला. ते छायाचित्र शमीने सोशल मीडियावरून प्रसिद्ध केले. रवींद्र जडेजानेही पंतप्रधानांशी संवाद साधला.

जडेजा यांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी शुभमन गिलशी हस्तांदोलन केले. यानंतर ते मोहम्मद शमीकडे गेले आणि त्याला मिठी मारली. पीएमने त्याला सांगितले, "तुम्ही यावेळी खूप चांगल खेळला.

मग ते जसप्रीत बुमराहकडे गेले आणि त्याला विचारले की, तुला गुजराती बोलता येत का, ज्यावर बुमराह म्हणाला - थोड थोड येत.

शमीने मोदींसोबत फोटो पोस्ट करताना लिहिले की, ‘‘दुर्दैवाने कालचा आमचा दिवस नव्हता. या संपूर्ण स्पर्धेत आमच्या संघाला आणि मला पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्व भारतीयांचे आभार मानू इच्छितो. ड्रेसिंग रूममध्ये येऊन मनोधैर्य उंचावल्याबद्दल आम्ही पंतप्रधान मोदींचे आभारी आहोत. आम्ही पुन्हा उसळी घेऊ.’’

जडेजानेही मोदींसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले की, ‘‘आम्ही चांगली कामगिरी केली. परंतु, काल पराभव झाला. आम्ही सर्वजण दुःखी झालो, मात्र लोकांनी दिलेल्या पाठिंब्याच्या बळावर पुढील वाटचाल करू. पंतप्रधानांनी काल ड्रेसिंग रूमला दिलेली भेट विशेष आणि खूप प्रेरणादायी होती.’’

प्रिय भारतीय संघ,

तुमचे कौशल्य आणि निश्‍चय संपूर्ण विश्‍वकरंडक स्पर्धेत ठळकपणे दिसला आहे. तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने खेळ केला आणि संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचावली. आम्ही आज आणि यापुढेही तुमच्या पाठीशी राहू.

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: नागपुरात विजांचा कडकडाटसह पावसाला सुरूवात...

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT