Ranji Trophy Final
Ranji Trophy Final  esakal
क्रीडा

Ranji Trophy Final : 'दादा'ला जमलं नाही ते मंत्री तिवारी करून दाखवणार; तीन दशकांचा 'बंगाल दुष्काळ' संपणार?

अनिरुद्ध संकपाळ

Ranji Trophy Final : बंगालचा क्रिकेट संघ म्हटलं की प्रिन्स ऑफ कोलकाता सौरव गांगुलीचाच चेहरा डोळ्यासमोर येतो. सौरव गांगुलीने आपल्या डावखुऱ्या शैलीदार फलंदाजीने, उत्तम नेतृत्व कौशल्याने आणि नंतर बीसीसीआयचा अध्यक्ष होऊन दिग्गजत्व मिळवले. मात्र बंगालचा कर्णधार म्हणून त्याला आपल्या राज्याच्या संघाला रणजी ट्रॉफी काही जिंकून देता आली नाही. गेल्या काही वर्षात बंगालने रणजी ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी 2019 - 20 पासून सलग तीन हंगामात सेमी फायनल गाठली आहे.

आता ही संधी बंगालचा क्रीडामंत्री असलेल्या मनोज तिवारीला मिळाली आहे. आजपासून इडन गार्डनच्या घरच्या मैदानावर बंगाल जयदेव उनाडकटच्या नेतृत्वात खेळणाऱ्या तगड्या सौराष्ट्र सोबत ट्रॉफीवर कब्जा मिळवण्यासाठी भिडणार आहेत.

बंगाल आणि सौराष्ट्र हे 2019 - 2020 च्या हंगामात देखील ट्रॉफीसाठी भिडले होते. त्यावेळी घरच्या मैदानावर खेळणाऱ्या सौराष्ट्रने बंगालला मात देत विजेतेपद पटकावले होते. त्यावेळी सौराष्ट्रचा कर्णधार जयदेव उनाडकटच होता.

बंगालने आपली शेवटची रणजी ट्रॉफी संबरन बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली 1989 - 90 ला जिंकली होती. पावसाचा फटका बसलेल्या या सामन्यात बंगालने सरस धावगतीच्या जोरावर सामना जिंकला होता. हा सामना देखील इडन गार्डनवरच झाला होता.

या सामन्यात सौरव गांगुली देखील खेळला होता. मात्र तो त्यावेळी संघाचा कर्णधार नव्हता. त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत 22 धावा केल्या होत्या.

आता जवळपास तीन दशकांनंतर बंगाल पुन्हा एकदा आपल्या घरच्या मैदानावर रणजी ट्रॉफी फायनल खेळत आहे. त्यामुळे त्यांना विजेतेपदाचा 33 वर्षाचा दुष्काळ संपवण्याची चांगली संधी आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: सभा माझी पण हवा तुमची.. ! मोदींनी देखील केलं त्या दोघांचं कौतुक, यूपीतल्या रॅलीमध्ये काय घडलं?

Hansal Mehta: हंसल मेहता यांनी केली 'स्कॅम-3'ची घोषणा, हर्षद मेहता अन् तेलगीनंतर आता कुणाची कथा मांडणार? जाणून घ्या...

फक्त 2 पानांचा बायोडाटा, अन् थेट Google, Microsoft मध्ये मिळाली नोकरीची संधी, भारतीय वंशाच्या तरुणीची कमाल!

Sunil Chhetri Net Worth: ऑडी, फॉर्च्युनर सारख्या कारचा मालक, बेंगळुरूमध्ये आलिशान घर; फुटबॉलपटू सुनील छेत्रीची संपत्ती किती?

Latest Marathi News Live Update: दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात आप सहआरोपी - अंमलबजावणी संचालनालय

SCROLL FOR NEXT