Glenn Maxwell
Glenn Maxwell esakal
क्रीडा

Glenn Maxwell : RCB पहिल्या IPL विजेतेपदाच्या जवळ..? रोहितची बरोबरी करणाऱ्या मॅक्सवेलने चाहत्यांच्या आशा केल्या पल्लवीत

अनिरुद्ध संकपाळ

Glenn Maxwell RCB : ग्लेन मॅक्सवेलने 2021 मध्ये आरसीबीत दाखल झाला होता. त्यानंतर तो फ्रेंजायजीकडून 5 वा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने आरसीबीकडून सर्वात जास्त स्टाईक रेटने धावा केल्या आहेत. गेल्या सहा महिन्यात तर ग्लेन मॅक्सवेलने शतकांचा आणि विक्रमांचा रतीब घातला आहे.

त्याने भारतात झालेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये वेगवान शतक आणि चेस करताना पहिले द्विशतक ठोकले. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाकडून 5 वे टी 20 शतक देखील ठोकले. वेस्ट इंडीजविरूद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात 55 चेंडूत 120 धावा ठोकल्या. हे त्याचे ऑस्ट्रेलियाकडून टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पाचवे शतक ठरले.

याचबरोबर त्याने रोहित शर्माच्या टी 20 मध्ये सर्वाधिक शतक ठोकण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली.

ग्लेन मॅक्सवेलने संघाची अवस्था 2 बाद 57 अशी असताना ही शतकी खेळी केली. त्याने 50 चेंडूत शतकी खेळी केली. या शतकी खेळीने रॉयल चॅलेंजर बेंगलोरचे चाहते मात्र सुखावले असतील. कारण आयपीएल 2024 चा हंगाम सुरू होण्यास काही आठवडेच शिल्लक राहिले आहेत.

ग्लेन मॅक्सवेलचा सध्याचा फॉर्म पाहता तो आयपीएलचा येणारा हंगाम गाजवणार असं दिसतंय. त्याने आपल्या या शतकी खेळीत रिव्हर्स स्विप, रिव्हर्स स्कूप आणि रॅम्प शॉट खेळले. एडिलेडच्या मोठ्या मैदानात देखील त्याने लिलया षटकार ठोकले. मग चिन्नास्वामीच्या छोट्या मैदानावर तर ग्लेन मॅक्सवेल धुमाकूळ घालेल.

ग्लेन मॅक्सवेलने खूप काळानंतर अशी मोठी खेळी केलीय असं नाही. त्याने गेल्या 9 आंतरराष्ट्रीय खेळीत एक द्विशतकी आणि तीन शतकी खेळी केल्या आहेत. त्याने 106, 41, 201, 1, 2, 12, 104, 10, 120 अशा खेळ्या केल्या आहेत.

जेव्हापासून मॅक्सवेल आरसीबीत दाखल झाला आहे. त्याची फलंदाजी जास्तच खुलली आहे. तो छोट्या कालावधीतच फ्रेंचायजीकडून सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत पाचव्या स्थानावर पोहचला आहे. त्याचे स्ट्राईक रेटही सर्वांपेक्षा भारी आहे. त्यामुळे आरसीबी आयपीएलच्या 2024 हंगामात आपले पहिले विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न नक्कीच पाहू शकते.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात अर्ध्यातासापासून ईव्हीएम बंद

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

SCROLL FOR NEXT