Ruturaj Gaikwad Harshal Patel Shine India Defeated South Africa In 3rd T20I
Ruturaj Gaikwad Harshal Patel Shine India Defeated South Africa In 3rd T20I  esakal
क्रीडा

IND vs SA : गायकवाड - पटेलने भारताचे मालिकेतील आव्हान ठेवले जिवंत

अनिरुद्ध संकपाळ

विशाखापट्टणम : सलग दोन पराभव झालेल्या भारताने तिसऱ्या टी 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 48 धावांनी पराभव करत विजयाचे खाते उघडले. याचबरोबर आफ्रिकेचा मालिकेवर कब्जा करण्याचा मनसुबा देखील हाणून पाडला. भारताचे 180 धावांचे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या आफ्रिकेला 131 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून हर्षल पटेल 4 तर युझवेंद्र चहलने 3 विकेट घेतल्या. फलंदाजीत सलामीवीर ऋतुराज गायकवाडने 57 तर इशान किशनने 54 धावांची अर्धशतकी खेळी केली. (Ruturaj Gaikwad Harshal Patel Shine India Defeated South Africa In 3rd T20I)

भारताने ठेवलेल्या 180 धावांचा पाठलाग करणाऱ्या आफ्रिकेला पॉवर प्लेमध्येच दोन धक्के बसले. अक्षर पटेलने कर्णधार टेम्बा बावुमाला 8 तर हर्षल पटेलने रीझा हेंड्रिक्सला 23 धावांवर बाद केले. त्यानंतर युझवेंद्र चहलने आफ्रिकेला दोन धक्के दिले. त्याने रासी वेन डुसेनला 1 तर सेट झालेल्या प्रेटोरियसला 20 धावांवर बाद केले.

यानंतर आलेल्या डेव्हिड मिलर आणि क्लासनने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी संघाला 11 व्या षटकात सत्तरी पार करून दिली. मात्र हर्षल पटेलने मिलरला 3 धावांवर बाद करत पाचवा धक्का दिला. आफ्रिकेचा निम्मा संघ 71 धावात माघारी गेला. मिलर बाद झाल्यानंतर क्लासनने डावाची सूत्रे हातात घेत आफ्रिकेला शतकी मजल मारून दिली.

मात्र युझवेंद्र चहलने त्याला 29 धावांवर बाद करत आफ्रिकेला मोठा धक्का दिला. त्यानंतर आलेल्या इतर फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. वेन पार्नेलने 22 धावांची खेळी केली मात्र त्याला आफ्रिकेचा पराभव टाळता आला नाही. अखेर आफ्रिकेचा डाव 131 धावात संपुष्टात आला. भारताकडून हर्षल पटेलने 4 तर युझवेंद्र चहलने 3 विकेट घेतल्या.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारताने दमदार सुरूवात केली. सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि इशान किशन यांनी सहाव्या षटकातच संघाचे अर्धशतक धावफलकावर लावले. यात आक्रमक फलंदाजी करणाऱ्या ऋतुराजने मोठा वाटा उचलला.

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या दोन सामन्यात शांत असणारी ऋतुराज गायकवाडची बॅट अखेर तिसऱ्या आणि महत्वाच्या सामन्यात तळपली. त्याने अर्धशतकी खेळी करत संघाला 10 व्या षटकात 95 धावांपर्यंत मजल मारून दिली. मात्र त्यानंतर केशव महाराजने ही जोडी फोडली. ऋतुराज गायकवाड 35 चेंडूत 57 धावा करून केशव महाराजच्या गोलंदाजीवर त्याच्याकडे झेल देत बाद झाला.

ऋतुराज गायकवाड बाद झाल्यानंतर इशान किशनने आक्रमक फलंदाजी करत 31 चेंडूत अर्धशतक झळकावले. याचबरोबर भारताने 11 व्या षटकात शतकी मजल मारली. मात्र तबरेज शमसीने श्रेयस अय्यरला 14 धावांंवर बाद करत भारताला दुसरा धक्का दिला. पाठोपाठ प्रेटोरियसने 35 चेंडूत 54 धावा करणाऱ्या इशान किशनला बाद करत भारताला तिसरा धक्का दिला. यानंतर पंत आणि कार्तिक देखील प्रत्येकी 6 धावांची भर घालून परतले.

अखेर हार्दिक पांड्याने 21 चेंडूत 31 धावांची नाबाद खेळी करत संघाला 20 षटकात 5 बाद 179 धावांपर्यंत पोहचवले. दक्षिण आफ्रिकेकडून प्रेटोरियसने 2 तर शमसी, रबाडा आणि केशव महाराजने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: पंजाबचा कर्णधार सॅम करनने जिंकला टॉस, चेन्नई संघात दोन मोठे बदल; पाहा प्लेइंग-11

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

SCROLL FOR NEXT