Sa vs Ind 2nd ODI gqeberha Weather Forecast News sakal
क्रीडा

SA vs IND 2nd ODI : दुसरा ODI सामना होणार रद्द? आफ्रिकेतून आली मोठी अपडेट

Kiran Mahanavar

Sa vs Ind 2nd ODI gqeberha Weather Forecast News : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताच्या नजरा सीरिज जिंकण्यावर असणार आहेत. पहिल्या सामन्यात भारतीय संघाच्या गोलंदाजीने दमदार कामगिरी केली होती, त्यामुळे यजमान संघ अवघ्या 116 धावांत गारद झाला होता.

आता केएल राहुलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने दुसरा सामना जिंकला तर मालिका आपल्या नावावर होईल. पण त्याआधी दक्षिण आफ्रिकेतून मोठी अपडेट समोर आली आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. मात्र, उरलेल्या दोन सामन्यांमध्ये पावसाचा तडाखा बसला नाही आणि मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली. पहिल्या वनडेतही पावसामुळे कोणतीही अडचण आली नाही. मात्र, दुसऱ्या वनडेबाबत हवामानाची चिंता आहे.

दुसरा एकदिवसीय सामना पोर्ट एलिझाबेथ येथे खेळला जाणार आहे. Accuweather च्या अहवालानुसार, दिवसभरात 25 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. 37 टक्के ढगाळ वातावरण राहील. मात्र, हा फारसा चिंतेचा विषय नाही.

तापमानाबाबत बोलायचे झाले तर आज येथील कमाल तापमान 23 अंश सेंटीग्रेड, तर किमान तापमान 17 अंश सेंटीग्रेडपर्यंत राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या डाेळ्यात पाणी! 'सातारा जिल्ह्यातील शंभर हेक्टरवरील पिकांना फटका': अतिवृष्टीत खरीप पिकांचे मोठे नुकसान

Satara child health: 'साताऱ्यात लहान मुलांमध्ये वाढले संसर्गजन्य आजार'; सर्दी, खोकला, ताप, जुलाबाचे रुग्ण

माेठी बातमी! 'म्‍हसवडमधील १४ शेतकऱ्यांची जमीन शासनाकडे'; ३२ वर्षे माेबदलाच नाही, स्‍वखुशी’ शब्‍दाने ‘खुदकुशी’ची वेळ

Karad Crime: सोन्याचे १५ तोळे दागिने लंपास; पवारवाडीतील प्रकार, तीन तासांत हातसफाई

Healthy Morning Breakfast: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा लाल भोपळ्याचे थालीपीठ, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT