Sam Curran
Sam Curran esakal
क्रीडा

Sam Curran : फलंदाजी करताना गॉगल घालून शायनिंग करणाऱ्या सॅम करनला विंडीजने चांगलंच चोपलं

अनिरुद्ध संकपाळ

Sam Curran Batting With Sun Glasses : रविवारी झालेल्या वेस्ट इंडीज आणि इंग्लंड यांच्याकील पहिला वनडे सामन्यात इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन हा सन ग्लासेस घालून फलंदाजी करताना दिसला. सहसा क्रिकेटपटू गोलंदाजी करताना किंवा फिल्डिंग करताना सन ग्लासेस घालतात. मात्र या पठ्ठ्याने फलंदाजी करताना देखील सन ग्लासेस घातले.

मात्र याच सॅम करनची (Sam Curran) वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांनी तुफान धुलाई केली. इंग्लडने ठेवलेल्या 326 धावांचे आव्हान पार करणाऱ्या वेस्ट इंडीजच्या फलंदाजांनी सॅम करनच्या 9.5 षटकात तब्बल 98 धावा चोपल्या. तो इंग्लंडकडून वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज झाला आहे.

सॅम करनने फलंदाजीत थोडीफार चमक दाखवली. त्याने 26 चेंडूत 38 धावांची खेळी केली. फलंदाजीला येताना त्याने हेलमेटसोबतच सन ग्लासेस देखील घातले होते. यामुळे सोशल मीडियावर याची चांगली चर्चा झाली. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात सर्वबाद 325 धावा केल्या होत्या. त्यात हॅरी ब्रुकने सर्वाधिक 71 धावा केल्या. तर क्राऊली आणि सॉल्ट यांनी अनुक्रमने 48 आणि 45 धावांचे योगदान दिले.

इंग्लंडचे हे 326 धावांचे आव्हान वेस्ट इंडीजने 48.5 षटकात पार केले. कर्णधार शाय होपने 83 चेंडूत नाबाद 109 धावांची शतकी खेळी केली. तर अथनाजेने 66 धावांचे योगदान दिले. रोमिरो शेफर्डने 49 धावा करत विंडीजच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT