Poonawalla Fincorp presents schoolympics 2023 season 6
Poonawalla Fincorp presents schoolympics 2023 season 6 
क्रीडा

Schoolympics 2023 Football : कल्याणी, पीआयसीटी मॉडेलचा फुटबॉलमध्ये धडाका!

सकाळ वृत्तसेवा

Poonawalla Fincorp presents schoolympics 2023 season 6 : स्कूलिंपिक स्पर्धेत पाषाणच्या एनसीएल मैदानावर मुलांच्या विभागात मांजरीच्या कल्याणी स्कूलच्या शौर्य आनंद याने ३, आरव नायर २, आदित्य लखोटिया, जय कोरे, आद्यंत भार्गव यांनी प्रत्येकी एक गोल करत न्यू पुणे पब्लिक स्कूल, आकुर्डीवर ८-० अशा मोठ्या फरकाने विजय मिळविला.

पीआयसीटी मॉडेल स्कूल, म्हाळुंगेच्या रणवीर पाटील याने तिसऱ्या मिनिटाला पहिला गोल केला त्यानंतर पार्थ भराडिया याने लगेच चौथ्या मिनिटाला दुसरा गोल केला नंतर दर्श ठक्कर व नील इंदूरकर यांनी प्रत्येकी दोन गोल केले व धडाक्यात झालेली सुरुवात कायम ठेवली. ऋषी दाभोळकर, आदित्य पाटील यांनी प्रत्येकी एक गोल करत पर्लड्रॉप स्कूल, कोंढवा वर ८-० असा सरळ विजय मिळविला. निर्धारित वेळेत दोन्ही संघांचे प्रत्येकी एक गोल झाल्यानंतर टायब्रेकमध्ये टिळक रोड डीईएस सेकंडरी स्कूलच्या वेद भुतकर, परीक्षित राईपुरे, सोहम दिवान, दर्पण अग्निहोत्री यांनी गोल करून रावेतच्या सिटी प्राइड स्कूल वर ५-३ असा विजय मिळविला. निर्धारित वेळेत दोन्ही संघाचे एक एक गोल झाल्यानंतर टाय ब्रेकमध्ये चुरशीच्या झालेल्या सामन्यात अभिषेक विद्यालयमीने एल्प्रो इंटरनॅशनलवर ६-५ ने विजय मिळविला.

मुलींचे सामने धनकवडीतील भारती विद्यापीठाच्या मैदानावर सुरु आहे. बालेवाडीच्या ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलच्या शर्वरी मानेने हॅट्ट्रीक नोंदवीत नऱ्हेच्या जेएसपीएम ब्लॉसम पब्लिक स्कूलवर ३-० असा रोमहर्षक विजय साकारला. निर्धारित वेळेत दोन्ही संघाना गोल करता न आल्याने पेनल्टी शूटआऊट मध्ये सदाशिव पेठेच्या एसपीएम इंग्लिश स्कूलच्या जुई दाभोलकर व स्वरदा कुलकर्णी यांनी प्रत्येकी एक गोल केला व दौंडच्या पोदार इंटरनॅशनल स्कूलवर २-१ असा विजय मिळविला. पोदारच्या कादंबरी शिंदेला एकच गोल करता आला. कोथरूडच्या सिटी इंटरनॅशनल स्कूलने कॅम्पच्या अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूलवर पेनल्टी शूटआऊट मध्ये तनया जोशीने केलेल्या एक गोलाच्या जोरावर विजय संपादन केला. युनिव्हर्सिटी रोडच्या एसईएस गुरुकुलने केया तेलंगने केलेल्या एक गोलावर खडकीच्या सेंट जोसेफ कॉन्व्हेंट गर्ल्स स्कूलवर १-० असा विजय मिळविला.

सविस्तर निकाल :

  सिटी इंटरनॅशनल, कोथरूड : २ (शंतनू निखारे ६, हर्षवर्धन क्षीरसागर ३९) विव अँग्लो उर्दू बॉईज, कॅम्प : ०. पीआयसीटी मॉडेल, म्हाळुंगे : ८ (रणवीर पाटील ३, पार्थ भराडिया ४, दर्श ठक्कर ६,२५, नील इंदुलकर १०,१४, ऋषी दाभोळकर २१, आदित्य पाटील ३०) विवि पर्लड्रॉप, कोंढवा : ०. व्हीएनसीपीएस : ४ (आदित्य चोआरे ९, २५, शौर्य जाधव ५, आयुष घुले २४) विवि ऑर्चिड इंटरनॅशनल, आंबेगाव : ०. विखे पाटील मेमोरियल, लोहगाव : ३ (आदित्य रानडे ४, सोहम गाढवे १८, २२) विव मास्टरमाईंड ग्लोबल : ०. कल्याणी, मांजरी : ८ (शौर्य आनंद २, १३, ३८, आरव नायर ३, ७, आदित्य लखोटिया ४, जय कोरे २५, आद्यंत भार्गव २२) विवि न्यू पुणे पब्लिक, आकुर्डी पीसीएमसी : ०. डीईएस, टिळक रोड : ५ (वेद भुतकर, परीक्षित, राईपुरे, सोहम दिवान, दर्पण अग्निहोत्री) विवि सिटी प्राइड स्कूल,रावेत : ३ (अर्णव,दिप्तांगशु, आयान). अभिषेक, चिंचवड : ५ (मिहीर गजबरे, आदित्य कोरशेट्टी, सार्थक लांघे, आदर्श जाधव, प्रथमेश कदम, सुशांत पाचपांडे विवि एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड : ४ (घर्व बझाझ ,आहान बक्षी, ईशान पाटील, अगस्त्या मर्कट्या). मुली : ग्लोबल इंटरनॅशनल, बालेवाडी : ३ (शर्वरी माने ८, १५, २३) विवि जेएसपीएम ब्लॉसम पब्लिक, नऱ्हे :०. सेंट हेलेनाज, कॅम्प : ४ (नुहा रझाक ५, समीरा धोटे १२, ज्ञानदा वाडकर २४, २८) विवि अंजुमन आय इस्लाम पीर मोहम्मद, येरवडा :०. एसपीएम इंग्लिश, सदाशिव पेठ : २ (जुई दाभोळकर, स्वरदा कुलकर्णी) विवि पोदार इंटरनॅशनल, दौंड : १ (कादंबरी शिंदे). सिटी इंटरनॅशनल, कोथरूड : १ (तनया जोशी) विवि अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल, कॅम्प :०. एसईएस गुरुकुल, : १ (केया तेलंग ४) विवि सेंट जोसेफ गर्ल्स, खडकी : ०. अभिनव इंग्लिश स्कूल : २ (वैदेही जोशी ९, मैत्रेयी मनोहर २२) विवि ज्योती इंग्लिश स्कूल : ०.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT