Selection Committee already knew about Prithvi Shaw
Selection Committee already knew about Prithvi Shaw  
क्रीडा

निवड समितीचा खोटारडेपणा; पृथ्वीबद्दल आधीच माहित होते

वृत्तसंस्था

मुंबई : भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉवर उत्तेजक चाचणीमध्ये दोषी आढळल्याने त्याच्यावर बीसीसीआयने आठ महिन्यांची बंदी घातली आहे. मात्र, या साऱ्या प्रकरणात निवड समितीचा खोटेपणा समोर आला आहे. 

वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी संघ निवडताना प्रसाद यांनी पृथ्वीच्या मांडीला दुखापत झाली असल्याचे सांगितले होते. वास्तविक तो उत्तेजक चाचणी दोषी सापडला आहे हे बीसीसीसाआयला माहित होते म्हणून त्याचा विचार झाला नव्हता.

इंदूरमध्ये झालेल्या मुश्‍ताक अली करंडक क्रिकेट स्पर्धेत 22 फेब्रुवारी 2019 रोजी प्रृथ्वी शॉच्या मुत्राचे नमुने घेण्यात आले. त्याच्या या नमुन्यात टब्रुटालाईन हे निषिद्ध उत्तेजक सापडले आहे. उत्तेजक द्रव्य सेवन प्रतिबंधक नियमाचा भंग केल्यामुळे बीसीसीआयने ही कारवाई केली आहे.

मुश्‍ताक अली स्पर्धेदरम्यान आपल्याला खोकला झाला होता त्यावेळी आपण त्यावरचे औषध घेतले होते. त्या औषधार बंदी असलेले उत्तेजक असल्याची आपल्याला माहिती नव्हती, अजाणतेपणी आपल्या हातून हे कृत्य झाले. कामगिरी उंचावण्यासाठी जाणीवपूर्वक आपण उत्तेजक घेतले नसल्याचा खुलाला पृथ्वीने बीसीसीआयच्या समितीसमोर केला त्याचा हा खुलासा मान्य करण्यात आला त्यामुळे त्याच्यावर आठ महिन्यांचीच बंदी घालण्यात आली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: निवडणूक आयोगाची मोठी कारवाई! रत्नागिरीत तीन कोटींची रोकड पकडली

SCROLL FOR NEXT