Shaheen Afridi
Shaheen Afridi  Esakal
क्रीडा

Shaheen Afridi PCB : शाहीन आफ्रिदीच्या कॅप्टन्सीवर टांगती तलवार; बाबरप्रमाणे होणार उचलबांगली?

अनिरुद्ध संकपाळ

Shaheen Afridi PCB : शाहीन आफ्रिदीची पाकिस्तानाच्या टी 20 संघांचा कर्णधार म्हणून नोव्हेंबरमध्ये निवड करण्यात आली होती. मात्र त्याच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या मालिकेत न्यूझीलंडने पाकिस्तानचा 4-1 असा पराभवे केला होता. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डात अनेक बदल झाले आहेत. त्यात पीसीबीचे नवे चेअरमन मोहसीन नक्वी यांनी शाहीन आफ्रिदीच पाकिस्तान टी 20 संघाचा कर्णधार असेल का हे सांगण्यास नकार दिला.

नक्वी यांनी निवड समितीच्या लाँचवेळी नवीन निवडसमिती पाकिस्तानचा कर्णधार निवडेल असे सांगितले. यामुळे शाहीन आफ्रिदीचे कर्णधारपद जाणार का अशी चर्चा सुरू आहे.

नोव्हेंबर महिन्यात आफ्रिदीची टी 20 संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली होती. त्याने एका मालिकेत पाकिस्तानचे नेतृत्व केले. न्यूझीलंडविरूद्धच्या या मालिकेत पाकिस्तानता 4-1 असा पराभव झाला. त्यात पीएसएल हंगाम देखील वाईट गेला.

त्याच्या नेतृत्वाखालील कलंदरचा संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर पोहचला. त्यांना 10 पैकी एकाच सामन्यात विजय मिळवता आला.

मोहसीन खान यांनी कॅप्टन्सीबाबत कोणताही शक्यता नाकारलेली नाही. नक्वी म्हणाले की, 'कोण कर्णधार होणार हे मला माहित नाही, शाहीन कर्णधारपदी कामय राहणार की नवा कर्णधार येणार हे फिटनेस कॅम्पनंतरच कळणार आहे. काही तांत्रिक मुद्दे देखील आपण लक्षात घेतले पाहिजे. आम्हाला दीर्घकालीन उपाय हवा आहे. मग तो शाहीन असेल किंवा नवीन कोणी तरी आम्ही त्यासोबत दीर्घ काळ काम करणार आहोत.'

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT