Shweta Sehrawat leading run-scorer Women's Under-19 T20 World Cup sport cricket
Shweta Sehrawat leading run-scorer Women's Under-19 T20 World Cup sport cricket sakal
क्रीडा

'सर, आधी बारावीची परीक्षा देते आणि मगच कॅम्पला येते'; व्हीव्हीएस लक्ष्मण यांना पत्र

सकाळ वृत्तसेवा

Women's Under-19 T20 World Cup: सर, आधी बारावीची परीक्षा देते आणि मगच कॅम्पला येते, असे थेट पत्र राष्ट्रीय निवड समितीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांना लिहिणारी, परीक्षा देऊन कॅम्पमध्ये आल्यानंतरच्या सामन्यात तडाखेबाज शतक लगावणारी, नुकत्याच संपलेल्या १९ वर्षांखालील मुलींच्या पहिल्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारी आश्वासक फलंदाज म्हणजे श्वेता सेहरावत.

भारतीय मुलींनी १९ वर्षांखालील पहिला टी-२० वर्ल्ड कप जिंकला. या संघातून भविष्यातील उत्तम क्रिकेटपटू मिळण्याची चिन्हे आहेत. त्यातीलच एक आहे श्वेता सेहरावत.

उजव्या हाताची तडाखेबाज आणि हुकमी फलंदाज म्हणून तिने कारकिर्दीच्या सुरुवातीलाच जम बसविला आहे. वर्ल्ड कपमधील अंतिम सामना वगळता तिने प्रत्येक सामन्यात तडाखेबाज फलंदाजी केली आहे. यातून तिचे सातत्य दिसून येते.

दिल्लीत जन्मलेल्या श्वेताची जडणघडण क्रिकेटपटू म्हणूनच झाली आहे. अगदी वयाच्या तिसऱ्या वर्षी ती मोठी बहीण स्वातीसोबत स्थानिक ॲकॅडमीत जात होती. तिच्या वडिलांनी मग तिला स्वतंत्रपणे वसंत कुंज ॲकॅडमीत दाखल केले. तेथे फक्त दोन मुली होत्या. बाकी सगळी मुलेच. येथेच तिची आक्रमक फलंदाज म्हणून जडणघडण झाली.

वयाच्या बाराव्या वर्षी तिला दिल्लीच्या वरिष्ठ संघ निवडीसाठीच्या शिबिरात निमंत्रित करण्यात आले होते. तिचे फटके पाहूनच निवड समितीने तिला हिरवा कंदील दाखविला.

त्यामुळे तिची १६ वर्षांखालील संघात निवड झाली. हंगामातील पहिल्याच सामन्यात तिने अर्धशतक झळकावले. त्यानंतर तिने १९ वर्षांखालील संघात स्थान मिळविले.

त्यानंतर याच वयोगटाच्या राष्ट्रीय संघात स्थान पटकाविले. भारत, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या त्रिकोणी मालिकेत तिने १५१ च्या भन्नाट सरासरीने १६४ धावा फटकाविल्या. १९ वर्षांखालील न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी ती कर्णधार होती.

तिने या मालिकेत १८० धावा करताना पाहुण्या न्यूझीलंडला ५-० असे पराभूत केले. या यशाने तिची वर्ल्ड कपसाठी उपकर्णधार म्हणून निवड झाली आणि तिने दक्षिण आफ्रिका गाजविली.

सलामीला येणारी श्वेता गॅपमधून चौकार मारण्यासाठी प्रसिद्धीस आली ती याच वर्ल्ड कपमधून. सुरुवातीला जम बसण्यास काही वेळ घेणारी श्वेता नंतर मात्र लिलया चौकार वसूल करण्यास सुरुवात करते.

श्वेता मानसिक आणि शारीरिकदृष्ट्याही अतिशय कणखर खेळाडू आहे. खेळपट्टीवर अधिकाधिक वेळ थांबून धावा करत राहण्याचा तिचा दमसास मोठा आहे.

तिची फलंदाजी वैविध्यपूर्ण आहे. एकाच प्रकारच्या चेंडूवर ती किमान दोन-तीन प्रकारचे वेगवेगळे फटके मारू शकते. ही तिची क्षमता तिला इतरांपेक्षा काकणभर सरस ठरविते.

वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेने कठीण आव्हान भारतीय संघासमोर दिल्यानंतर तिने चोख प्रत्त्युत्तर देताना ९२ धावांची खेळी करत भारताचा विजय सुकर केला.

ही खेळी २० चौकारांनी सजली होती. सांगलीच्या स्मृती मानधना हिला आदर्श मानणारी श्वेता... तिच्यासाठी येणारा वरिष्ठ महिला वर्ल्ड कप चुकल्याची भावना मात्र टोचणारी असेल; पण तिचे भविष्य उज्ज्वल आहे, हे निश्चित.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिंदू-मुस्लीम ज्या दिवशी करेन, त्या दिवशी...; 'जास्त मुलांच्या' वक्तव्यावर PM मोदींनी दिलं स्पष्टीकरण

Artificial intelligence: आपल्याकडे खूपच कमी वेळ उरलाय... एआयवर IMF प्रमुखांनी केली मोठी भविष्यवाणी

IPL 2024: क्वालिफायर अन् फायनल स्टेडियममध्ये जाऊन पाहायचेत? कसे आणि कधी करणार तिकीट बूक, जाणून घ्या

Bhavesh Bhinde: रिक्षा चालकाचा मुलगा कसा बनला होर्डिंगसम्राट? भावेश भिंडेवर बलात्काराचे देखील आरोप

Marathi News Live Update: बेकायदा होर्डिंगविरोधात २४० तक्रारी, पण कारवाई नाही; उदय सामंत यांचा आरोप

SCROLL FOR NEXT