क्रीडा

फेरॅन कोरोमीनासची दुसरी हॅटट्रिक

सकाळवृत्तसेवा

मडगाव - इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) गोव्यातील सामन्यात पुन्हा गोलांचा पाऊस पडला. यजमान एफसी गोवा संघाचा स्ट्रायकर फेरॅन कोरोमीनास याने वैयक्तिक तसेच स्पर्धेतील दुसरी हॅटट्रिक नोंदविली, त्यामुळे गोव्याने केरळा ब्लास्टर्सचा बचाव ५-२ असा भेदत दणदणीत विजय मिळविला.

स्पेनच्या कोरोमीनासने उत्तरार्धात सात मिनिटांच्या अंतराने तीन गोलांचा धडाका लावत ब्लास्टर्सचे आव्हान परतावून लावले. यात ब्लास्टर्सला गोलरक्षक पॉल रॅचुब्का याची ढिलाई भोवली. त्याचवेळी कोरोमीनासच्या धूर्त आणि दक्ष खेळालाही दाद द्यावी लागेल. कोरोमीनासने यापूर्वी याच मैदानावर बेंगळुरू एफसीविरुद्ध स्पर्धेतील पहिली हॅटट्रिक नोंदविली होती. त्या सामन्यातही सात गोल झाले होते. त्यात गोव्याने ४-३ अशी बाजी मारली होती.

गोव्याने चार सामन्यांत तिसरा विजय मिळविला. बेंगळुरू एफसी, चेन्नईयीन एफसी यांच्याप्रमाणेच गोव्याचे नऊ गुण झाले. यात गोव्याचे सर्वाधिक १३ गोल आहेत. बेंगळुरूचे १०, तर चेन्नईयीनचे नऊ गोल झाले आहेत. जास्त गोलमुळे गोव्याने गुणतक्‍त्यात आघाडी घेतली. 

नेहरू स्टेडियमवर पूर्वार्धात २-२ अशी बरोबरी होती. सामन्याची सुरवात जोरदार झाली. ब्लास्टर्सने खाते उघडण्याची शर्यत जिंकली. जॅकीचंद सिंगने उजव्या बाजूने क्रॉस पास देत ही चाल रचली. मार्क सिफ्नेऑसने डाव्या पायाने चेंडूवर नियंत्रण मिळविले आणि मोठ्या कौशल्याने उजव्या पायाने ताकदवान फटका मारला. यजमान गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी त्यावर चकला.

गोव्याने खचून न जाता खेळाचा वेग कायम राखला. एडू बेडिया आणि नारायण दास यांनी रचलेल्या चालीचे मॅन्यूएल लॅंझारोटे याने सोने केले. ब्लास्टर्सचा गोलरक्षक पॉल रॅचुब्का याला पुरेशी दक्षता आणि चपळाई दाखविता आली नाही.

गोव्याचा दुसरा गोल होण्यास रॅचुब्काची घोडचूक कारणीभूत ठरली. त्याने नेटसमोर प्रतिस्पर्धी सज्ज दिसत असूनही हलगर्जीपणे किक मारली. चेंडू थेट फेरॅन कोरोमीनास याच्या पायापाशी गेला. त्याने तो अलगद लॅंझारोटेकडे सोपविला. लॅंझारोटेने ब्लास्टर्सच्या इझुमी अराटा आणि संदेश झिंगन यांना धूर्तपणे चकवीत रॅचुब्काला चुकीची किंमत मोजायला लावली. त्याने नेटच्या कोपऱ्यात मैदानालगत फटका मारत अप्रतिम गोल केला.

ब्लास्टर्सने १३ मिनिटांनी बरोबरी साधली. जॅकीचंदने मिलान सिंगच्या साथीत चाल रचली. मिलानकडून चेंडू परत मिळताच त्याने महंमद अली, अहंमद जाहौह आणि नारायण दास अशा तिघांना चकवीत चेंडू नेटमध्ये मारला. उत्तरार्धाचा मानकरी कोरोमीनास ठरला. त्याने ४८व्या मिनिटाला गोव्याला आघाडी मिळवून दिली. जाहौहने त्याला पास दिला. त्यानंतर तीन मिनिटांनी त्याने ब्रॅंडन फर्नांडिसचा पास सत्कारणी लावला. मग 
लॅंझारोटेच्या पासच्या जोरावर त्याने हॅट्ट्रिक साजरी केली.

निकाल
एफसी गोवा - ५ (मॅन्युएल लॅंझारोटे ९, १८, फेरॅन कोरोमीनास  ४८, ५१, ५५) विजयी विरुद्ध  केरळा ब्लास्टर्स - २ (मार्क सिफ्नेऑस ७, जॅकीचंद सिंग ३१)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकली; चेन्नईला चेन्नईत मात देण्यासाठी सज्ज

Buss Accident : उत्तर प्रदेशमध्ये भीषण बस अपघात; ट्रकच्या वेगाने बस कापून निघाली, सात जणांचा मृत्यू

T20 WC 2024 India Squad : विकेटकिपर निवडणं UPSC क्रॅक करण्यापेक्षाही झालं अवघड; 'यांनी' निवडसमितीची डोकेदुखी वाढवली

Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग! वणव्यांमुळे ३३.३४ हेक्टरवरील झाडे जळून खाक

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

SCROLL FOR NEXT