क्रीडा

‘स्प्रिंट’मधील जमैकाचे वर्चस्व संपुष्टात

पीटीआय

लंडन - जागतिक मैदानी स्पर्धेत बोल्टच्या पराभवाच्या धक्‍क्‍याचा प्रभाव निवळत नाही, तोच महिला शंभर मीटरमध्ये एलिन थॉम्पसनच्या पराभवाने जमैकाला आणखी एक धक्का बसला. यामुळे २००७ च्या ओसाका स्पर्धेपासून सुरू झालेले जमैकाचे स्प्रिंटवरील वर्चस्व संपुष्टात आले, असेच म्हणावे लागेल. गॅटलीनच्या सुवर्णपदकानंतर अमेरिकेची टोरी बोवी महिला शर्यतीत सुवर्णपदकाची मानकरी ठरली. 

गेल्या दोन वर्षांपासून एलिन अजिंक्‍य असल्यामुळे बोल्टपेक्षा एलिन थॉम्पसनला सुवर्णपदकाची अधिक पसंती होती. रिओ ऑलिंपिकमध्ये दोन सुवर्णपदके मिळविणाऱ्या एलिनने येथेही आपणच जिंकणार असे संकेत उपांत्य फेरीत दिले होते. मात्र, बोल्टप्रमाणे एलिनचा प्रारंभ संथ झाला. तिथेच तिचे सुवर्णपदक निसटले. त्या तुलनेत आयव्हरी कोस्टच्या मेरी जोस टालू हिने वेगवान प्रारंभ केला. ४० मीटर अंतर शिल्लक असताना २६ वर्षीय रिओ ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या टोरी बोवीने वेग वाढविण्यास सुरवात केली. अंतिम रेषेवर तिने नेहमीच्या पद्धतीने ‘डीप’ केले आणि प्रथमच सुवर्णपदक आपल्या नावावर केले. शर्यत संपली त्या वेळी मेरी जोस जिंकली, असाच सर्वांचा समज झाला होता. मात्र, निकाल जाहीर होताच, टोरीने आनंदोत्सव सुरू केला. एलिन मात्र हताशपणे बाहेर जात होती. तिला पहिल्या तिघींतही स्थान मिळविता आले नाही. टोरीने १०.८५ सेकंदात सुवर्ण, मेरी जोसने १०.८६ सेकंदात रौप्य, तर नेदरलडॅंच्या डाफने शिफर्सने १०.९६ सेकंदात ब्राँझपदक मिळवले. एलिनला १०.९८ सेकंदात पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. 

बेल्जियमचे पहिलेच सुवर्णपदक 
हेप्टथलॉनमध्ये रिओ ऑलिंपिकविजेत्या २२ वर्षीय नफीसातोऊ थिआमने ६७८४ गुण मिळविले आणि स्पर्धेच्या ३४ वर्षांच्या इतिहासात प्रथमच बेल्जियमला सुवर्णपदक मिळवून दिले. दोन वर्षांपूर्वी बीजिंगमध्ये फिलिप मिलनोवने थाळीफेकीत रौप्यपदक जिंकले होते. यात भारताची स्वप्ना बर्मन ५४३१ गुणांसह २६ व्या स्थानावर आली. गोळाफेकीत रिओ ऑलिंपिकमधील ब्राँझपदक विजेत्या टॉम वॉल्शने २२.०३ मीटर अंतरावर गोळा फेकून सुवर्णपदक पटकाविले. महिला पोल व्हॉल्टमध्ये ग्रीकच्या युरोपियन, ऑलिंपिकविजेत्या एकीटेरिनी स्टेफानिदीने ४.९१ मीटर अंतर पार करीत विश्‍वविजेतेपदही आपल्या नावे केले. पुरुषांच्या चारशे मीटरमध्ये ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता व विश्‍वविक्रमवीर दक्षिण आफ्रिकेचा वायदे व्हॅन निकर्क, बहामाचा स्टिवन गार्डनर, बोट्‌सवानाचा बाबोलोकी थेबे, इसाक मकवाला या प्रमुख धावपटूंनी अंतिम फेरी गाठली. उपांत्य फेरीत गार्डनरने ४३.८९ सेकंद अशी सर्वांत वेगवान वेळ दिली. यात माजी विश्‍वविजेता लॉशाँ मेरीट उपांत्य फेरीतच गारद झाला. महिला भालाफेकीत भारताची राष्ट्रीय विक्रमवीर अनू राणीचे आव्हान पात्रता फेरीतच संपुष्टात आले. ती फक्त ५९.९३ मीटरपर्यंतच भाला फेकू शकली. 

थोडक्‍यात दिवस तिसरा
२००५ च्या हेलसिंकी स्पर्धेनंतर प्रथमच शंभर मीटरची दोन्ही सुवर्णपदके अमेरिकेला. 
२००५ मध्ये गॅटलीन व लॉरीन विलीयम्स वेगवान धावपटू ठरले होते. 
पराभवामुळे एलिन थॉम्पसनची मे २०१५ पासूनची विजयी मालिका खंडित.
हेप्टथलॉनमध्ये सुवर्णपदक जिंकून थिआमने बेल्जियमला स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सुवर्ण मिळवून दिले. 
जेफ्री किरुईच्या यशामुळे २०११ नंतर पुन्हा केनियाला पुरुष मॅरेथॉनचे सुवर्णपदक मिळवून दिले. 
रौप्यपदकामुळे केनियाच्या एडना किपलगाटचे महिला मॅरेथॉनमधील तिसरे सुवर्ण हुकले. तिने २०११ व २०१३ मध्ये सुवर्ण जिंकले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT