नागपूर - विभागीय क्रीडासंकुलात सुरू असलेल्या सीनियर राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत रविवारी झालेल्या महिला एकेरी लढतीत रिया मुखर्जीचे आव्हान मोडीत काढणारी पुण्याची रेवती देवस्थळे आक्रमक फटका लगावताना.
नागपूर - विभागीय क्रीडासंकुलात सुरू असलेल्या सीनियर राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत रविवारी झालेल्या महिला एकेरी लढतीत रिया मुखर्जीचे आव्हान मोडीत काढणारी पुण्याची रेवती देवस्थळे आक्रमक फटका लगावताना. 
क्रीडा

महाराष्ट्राच्या रेवतीची आगेकूच

सकाळवृत्तसेवा

नागपूर - महाराष्ट्राच्या रेवती देवस्थळी हिने पाचव्या मानांकित रिया मुखर्जीला धक्का देत वरिष्ठ गट राष्ट्रीय बॅडमिंटन स्पधेतील आपली आगेकूच कायम राखली. महाराष्ट्राच्याच मालविका बंसोड हिने देखील महिला एकेरीत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मात्र, अरुंधती पानतावणे, वैष्णवी भाले, रितिका ठक्‍कर व राशी लांबे या महाराष्ट्राच्या अन्य खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आले. गतवर्षीचा उपविजेता उत्तराखंडच्या लक्ष्य सेननेही आगेकूच कायम ठेवत पुढील फेरीत प्रवेश मिळविला.  

मालविकाने तीन गेमपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत अस्मिता छलियाचे आव्हान २१-१६, १६-२१, २१-१८ असे मोडीत काढले. वैष्णवीची घोडदौड मुंबईच्या सायली राणेने रोखून धरली. तिला सायकीकडून सरळ दोन गेम्समध्ये १६-२१, १०-२१ ने पराभव पत्करावा लागला. रितिकाला अटीतटीच्या सामन्यात पुण्याच्या पूर्वा बर्वेकडून १३-२१, २१-१९, २०-२२ ने पराभव पत्करावा लागला. राशीला तेराव्या मानांकित आकार्षी कश्‍यपने १७-२१, २१-१५, २१-१० ने मात दिली.

चौथी मानांकित नेहा पंडीतलाही पराभवाचा धक्‍का सहन करावा लागला. नेहाला त्रिशा जॉलीने १२-२१, १८-२१ ने पराभूत केले. पुरष एकेरीत विजेतेपदाची पसंती असलेल्या सातव्या मानांकित लक्ष्यला विजयासाठी संघर्ष करावा लागला. लक्ष्यने ५० मिनिटे रंगलेल्या लढतीत मैसनाम मैराबाला २१-१३, १२-२१, २१-१३ असे पराभूत केले. मुलींच्या एकेरीत अकराव्या मानांकित पुण्याच्या रेवती देवस्थळेने पाचव्या मानांकित रिया मुखर्जीला २१-१९, २०-२२, २१-१८ ने पराभूत करून अंतिम सोळामध्ये स्थान पटकाविले. 

महिला दुहेरीत अरुंधती पानतावणे व तिची पार्टनर अनुष्का पारिखला द्वितीय मानांकित जोडी हरिता एम. व अरुणा प्रभुदेसाईने २१-१८, २१-१८ ने पराभूत केले. दुहेरीतही रितिकाला पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईच्या सिमरन सिंघीसोबत खेळणाऱ्या रितिकाला महिमा अग्रवाल व संजना संतोष जोडीकडून १६-२१, १५-२१ ने हार पत्करावी लागली. 

पुरुष दुहेरीत अव्वल मानांकित के. चैतन्य रेड्‌डी व हेमगेंद्रबाबू रेड्‌डीचे आव्हान संपुष्टात आले. त्यांना रूपेशकुमार व सॅनवे थॉमस जोडीकडून १५-२१, १२-१५ असा पराभव पत्करावा लागला. अनिलकुमार राजू व वेंकट गौरव प्रसाद या द्वितीय मानांकित जोडीचेही आव्हान संपुष्टात आले. त्यांना उत्कर्ष अरोरा व स्वर्णराज बोराकडून २१-१२, १९-२१, १९-२१ ने हार पत्करावी लागली. विजेतेपदाच्या प्रबळ दावेदार जोडींपैकी एक चेतन आनंद व व्ही. दिजू यांनी ई. मोहनराज व सेंथिवेल गोविंदारासू यांचा २१-१४, २१-१४ ने पराभव करून पुढील फेरी गाठली.

अन्य निकाल -
(पुरुष एकेरी) - बोडित जोशी वि.वि. कौस्तुभ रावत २१-७, २१-१८, चिराग सेन वि.वि. आद्रियन जॉर्ज २१-१४, २१-११, राहुल भारद्वाज वि.वि. रोहित यादव २१-१३, २१-१०, राहुल यादव वि.वि. कार्तिक जिंदल २१-१२, २१-१३, अभिमन्यू टंडन वि.वि. सिद्धार्थ ठाकूर २१-१०, २१-१३, अंसल यादव वि.वि. मिथुन एम. १६-२१, २१-८, २१-१३. 

(महिला) - रिया मुखर्जी वि.वि. दीप्ती कुट्‌टी १८-२१,२१-१८, १-११, वृषाली जी. वि.वि. त्रिशा जॉली २१-१६, २१-१३, रित्विका शिवानी वि.वि. मानसी सिंग २१-८, २१-११, तनिष्क एम. वि.वि. कनिका कंवल २१-१९, २१-१९.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: रचिन रविंद्रचे शानदार अर्धशतक! चेन्नईच्या आशाही फुलवल्या

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT