indian olympic association
indian olympic association 
क्रीडा

ट्राउझर बरी...पण साडीदेखील चालेल

पीटीआय

नवी दिल्ली - एप्रिल महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत संचलन सोहळ्यात महिलांच्या पोषाखात बदल करून साडीऐवजी ट्राउझर परिधान करण्याचा निर्णय भारतीय ऑलिंपिक संघटनेने अलीकडेच घेतला. या निर्णयाचे महिला खेळाडूंकडून स्वागत झाले खरे, पण काही प्रमुख खेळाडूंनी ट्राउझर चालेल, पण साडी अधिक चांगली, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. 

ऑलिंपिक पदक विजेत्या पी. व्ही. सिंधू, साक्षी मलिक, बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा अशा प्रमुख खेळाडूंनी परंपरा मोडण्याची काही गरज नव्हती. ट्राउझरच्या निर्णयाने काही जणी आनंदी झाल्या असतीलही, पण अशा सोहळ्यात साडीच चांगली वाटते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. साडीऐवजी ट्राउझर परिधान करण्याच्या निर्णयाला बहुतांशी तरुण महिला खेळाडूंनी पाठिंबा दिला आहे. अर्थात, यातही काही जणींनी साडीदेखील चालली असती. आमची तक्रार नव्हती, असेही म्हटले आहे. 

साडी चांगली, ट्राउझर चांगले, याहून पुढे जात काही महिला खेळाडूंनी पुरुष, महिला समानता मानण्याच्या दृष्टीने टाकलेले हे एक पाऊल ठरावे, असेदेखील मत पुढे आले आहे. बदलांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघितले जावे, असेदेखील काही खेळाडू म्हणाल्या आहेत. प्रत्येक देशाचे खेळाडू त्यांच्या पारंपरिक पोषाखात संचलनात येतात. आपणही तेच करत आलो आहोत. मग एकदम हा बदलाचा निर्णय कसा आला, अशी भूमिकाही खेळाडूंनी 
मांडली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

Revoting: दोन गटांतील हाणामारीत 'ईव्हीएम'ची तोडफोड, 'या' राज्यात फेरमतदानाला सुरूवात

Latest Marathi News Live Update: ठाकरे गटाचे उमेदवार आज दाखल करणार अर्ज

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

World Hunger : काही देशांच्या युद्धामुळे जगभरात वाढले उपासमारीचे संकट; काय आहे परिस्थिती?

SCROLL FOR NEXT