Sushil Kumar back
Sushil Kumar back 
क्रीडा

वादग्रस्त लढतीनंतर सुशीलची पात्रता

वृत्तसंस्था

मुंबई/नवी दिल्ली - सुशील कुमारने अखेर टीकाकारांना गप्प करतानाच भारतीय कुस्ती महासंघाचीही काहीशी लाज राखली. भारतीय कुस्ती महासंघाने सुशील कुमारची प्रवेशिका चाचणीपूर्वीच पाठविली होती आणि त्याने निवड चाचणी सहज जिंकत महासंघाचीही शान राखली. 

सुशील कुमार तब्बल आठ वर्षांनी जागतिक स्पर्धेत खेळणार आहे. सुशीलने जितेंदर कुमारला निर्णायक चाचणी लढतीत ४-२ असे पराजित करून कझाकस्तान स्पर्धेतील ७४ किलो वजनी गटातील प्रवेशिका निश्‍चित केली. जितेंदरला ७९ किलो गटाची चाचणी खेळण्याची संधी आहे. 

राहुल आवारे जागतिक संघात
महाराष्ट्राच्या राहुल आवारे याने ६१ किलो गटाची पात्रता मिळवली. त्याने रवींदरचा ६-१ असा पराभव करीत ही कामगिरी साध्य केली. त्याने यापूर्वी नवीन कुमारला ९-४ असे हरविले होते. राहुलचा गट हा ऑलिंपिकमध्ये नाही. त्याने गतवर्षी राष्ट्रकुल स्पर्धेत ५७ किलो गटात सुवर्णपदक जिंकले होते. मात्र, त्याने आपला गट बदलला आहे. ‘‘जागतिक गटासाठी पात्र ठरलो असलो, तरी ऑलिंपिक गटात खेळणार नाही, याची थोडीशी खंत आहे. ऑलिंपिक चाचणी गटाच्या वेळी दुखावलेला खांदा अजून पूर्ण बरा झालेला नाही. पण, तरीही चांगली कुस्ती झाल्याचे समाधान आहे,’ असे राहुलने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Latest Marathi News Live Update :उद्धव ठाकरे यांची आज अलिबागमध्ये सभा

SCROLL FOR NEXT