westindies
westindies sakal media
क्रीडा

T20 WC: सलामीच्याच सामन्यात लज्जास्पद कामगिरी

सकाळ वृत्तसेवा

दुबई : ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडीज संघाची सुरुवात ही एखाद्या दुःखत स्वप्नापेक्षा कमी नव्हती. दोन वेळा ट्वेन्टी-२० विश्वकरंडक जेतेपद पटकावणाऱ्या कॅरेबियन संघाला या हंगामाच्या पहिल्याच सामन्यात इंग्लंड संघाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. पराभव देखील असा होता की, जो पचवणे खूप कठीण आहे. सामन्यानंतर कर्णधार किएरॉन पोलार्डने त्याच्या संघाची ही कामगिरी लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे. शनिवारी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यास भाग पाडल्यानंतर स्टार खेळाडूंनी सजलेला कॅरेबियन संघ १४.२ षटकांत अवघ्या ५५ धावांत गारद झाला. त्यामुळे विरोधी संघ इंग्लंडने हे छोटे लक्ष्य ८.२ षटकांत चार विकेट गमावून सहज गाठले.

सामना संपल्यानंतर कॅरेबियन कर्णधार किएरॉन पोलार्ड म्हणाला, ‘‘काहीही सांगण्यासारखे नाही, कोणत्याही परिस्थितीत अशी कामगिरी अस्वीकारार्ह आहे; परंतु आम्हाला हा पराभव विसरून पुढे जायचे आहे. आम्ही आमच्या लगतच्या तीन सामन्यांमध्ये फलंदाजी करताना चांगली कामगिरी केली नाही. आगामी सामन्यांमध्ये विरोधी संघासमोर आम्हाला आव्हानात्मक लक्ष्य ठेवावे लागेल.’’

तो पुढे म्हणाला, ‘‘आम्ही जवळजवळ संपूर्ण जगात क्रिकेट खेळतो. अशी घटना आमच्यासोबत घडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. आम्हाला अशा चकमकीचा अनुभव आहे. आता ही परिस्थिती स्वीकारावी लागेल. प्रत्येक पुढील सामना आमच्यासाठी महत्त्वाचा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

Crude Oil Prices: पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी! कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी घट

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT