thailand open badminton 2023 lakshya sen kiran george india semifinals
thailand open badminton 2023 lakshya sen kiran george india semifinals sakal
क्रीडा

Thailand Open : लक्ष्य सेनची उपांत्य फेरीत धडक; किरण जॉर्जचे आव्हान संपुष्टात

सकाळ वृत्तसेवा

क्वालालम्पूर : गेल्या काही काळामध्ये दुखापत व सुमार फॉर्ममधून जाणाऱ्या भारताच्या लक्ष्य सेन याने थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने मलेशियाच्या लिआँग हाऊ याच्यावर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

लक्ष्य-हाऊ यांच्यामध्ये पहिल्या गेममध्ये चुरस दिसून आली. पहिल्या ब्रेकदरम्यान लक्ष्य १०-११ असा अवघ्या एका गुणाने पिछाडीवर होता, पण त्यानंतर लक्ष्य याने झोकात पुनरागमन करीत १७-१७ अशी बरोबरी साधली.

भारताच्या या पठ्ठ्याने पहिला गेम २१-१९ असा जिंकत उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत १-० अशी आघाडी घेतली. लक्ष्यने दुसऱ्या गेममध्ये आपल्या खेळात आणखी सुधारणा केली. त्याने ११-८ अशी आघाडी घेतली. ही आघाडी त्याने १३-११ अशी वाढवली. अखेर हा गेम २१-११ असा जिंकण्यात त्याला यश मिळाले. लक्ष्यने ४१ मिनिटांमध्ये उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत विजय साकारला.

पहिल्यांदाच अंतिम चारमध्ये

लक्ष्य सेन या मोसमात पहिल्यांदाच उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला आहे. या मोसमात त्याला आतापर्यंत प्रतिमेला साजेशी कामगिरी करता आलेली नव्हती. लक्ष्यने इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेमध्ये उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. थायलंडआधी ती त्याची मोसमातील सर्वोत्तम कामगिरी होती. आता उपांत्य फेरीच्या लढतीत लक्ष्यला कुनलावूत वितीदसर्ण याचा सामना करावा लागणार आहे.

उपांत्यपूर्व फेरीत पराभव

या स्पर्धेमध्ये आपल्यापेक्षा वरच्या क्रमवारीतील खेळाडूंना पराभूत करीत आगेकूच करणाऱ्या भारताच्या किरण जॉर्जला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. तोमा पोपोव याने किरणला पराभूत करीत अंतिम चारमध्ये प्रवेश केला. तोमा याने किरण याच्यावर २१-१६, २१-१७ असा विजय साकारला. तोमा याने ४१ मिनिटांमध्ये किरणला पराभूत केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT