Ashley Nurse of West Indies
Ashley Nurse of West Indies 
क्रीडा

World Cup 2019 : पाकिस्तानची दाणादाण; 14 षटकांतच विंडीजचा विजय

वृत्तसंस्था

वर्ल्ड कप 2019 : नॉटिंगहॅम : विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत 'डार्क हॉर्स' अशी गणना झालेल्या संघांमधील लढत एकतर्फी ठरवीत वेस्ट इंडिजने पाकिस्तानला सलामीलाच मानहानिकारक पराभव पत्करण्यास भाग पाडले. पाकला 105 धावांत गुंडाळून विंडीजने 14व्या षटकातच विजयावर शिक्कामोर्तब केले. 

निर्धारित 50 षटकांचा हा सामना जेमतेम 35.2 षटकांत संपुष्टात आला. विंडीजने सात विकेट राखून बाजी मारली. पाकिस्तानच्या गोलंदाजांसमोर अशक्‍यप्राय आव्हान होते. महंमद आमीरने तीन विकेट टिपल्या हाच त्याला आणि पाकला थोडासा दिलासा ठरला.

वहाब रियाझ आणि हसन अली यांना धावाही रोखता आल्या नाहीत. युनिव्हर्स बॉस गेलने 33 चेंडूंत अर्धशतक फटकावले. त्याबरोबरच त्याने पाकच्या उरल्यासुरल्या आशा चिरडून टाकल्या. त्याचा वारसदार म्हणून ज्याचा उल्लेख होतो त्या निकोलस पूरन याने पाकच्या जखमेवर मीठ चोळणारी खेळी केली. 

तत्पूर्वी, विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी इंग्लंडमध्ये सर्वांत आधी दाखल झालेल्या पाकिस्तान संघातील फलंदाजांनी अखेर निराशाच केली. सलामीच्या सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांना कसाबसा शतकी पल्ला पार करता आला. 22व्या षटकात त्यांचा 105 धावांत खुर्दा उडाला. 

ट्रेंटब्रीज मैदानावर वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर याने नाणेफेक जिंकून पाकला फलंदाजीचे आमंत्रण दिले. पाक फलंदाज ठराविक अंतराने हजेरी लावून परतले. बिनीचा फलंदाज फखर आणि "वन-डाऊन' आलेला बाबर यांच्या प्रत्येकी 22 धावा सर्वोत्तम ठरल्या. याशिवाय आणखी दोघांनाच "डबल फिगर'मध्ये जाता आले. 

विंडीजकडून उजव्या हाताने वेगवान मारा करणारा गोलंदाज ओशाने थॉमस सर्वाधिक यशस्वी ठरला. त्याने चार विकेट घेतल्या. होल्डरने तीन विकेट टिपल्या. पाक कर्णधार पाचव्या क्रमांकावर आला, पण तो केवळ आठ धावा करू शकला. 

संक्षिप्त धावफलक : 
पाकिस्तान : 21.4 षटकांत सर्वबाद 105 (इमाम-उल-हक 2, फखर झमान 22-16 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार, बाबर आझम 22-33 चेंडू, 2 चौकार, हरीस सोहेल 8, सर्फराज अहमद 8, महंमद हफीज 16-24 चेंडू, 2 चौकार, इमाद वसीम 1, शदाब खान 0, हसन अली 1, वहाब रियाझ 18-11 चेंडू, 1 चौकार, 2 षटकार, महंमद आमीर नाबाद 3, शेल्डन कॉट्रेल 4-0-18-1, जेसन होल्डर 5-0-42-3, आंद्रे रसेल 3-1-4-2, कार्लोस ब्रेथवेट 4-0-14-0, ओशाने थॉमस 5.4-0-27-4) पराभूत विरुद्ध वेस्ट इंडिज ः 13.4 षटकांत 3 बाद 108 (ख्रिस गेल 50-34 चेंडू, 6 चौकार, 3 षटकार, शेय होप 11, डॅरेन ब्राव्हो 0, निकोलस पूरन नाबाद 34-19 चेंडू, 4 चौकार, 2 षटकार, शिम्रॉन हेटमायर नाबाद 7, महंमद आमीर 6-0-26-3, हसन अली 4-0-39-0, वहाब रियाझ 1.4-1-40-0)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT