India U19 vs Australia U19 Semi Final
India U19 vs Australia U19 Semi Final  Sakal
क्रीडा

U 19 WC Semi Final 2 : विकेट बाय विकेट अपडेट्स एका क्लिकवर

सुशांत जाधव

U 19 WC Semi Final 2 Cricket Score India U19 vs Australia U19 Semi Final : अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. शेख रशीद 94 (108) व कर्णधार यश धुल 110(110) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर निर्धारित 50 षटकांत भारतीय संघाने 5 गड्यांच्या मोबदल्यात 290 धावा करत ऑस्ट्रेलियासमोर 291 धावांचे आव्हान ठेवले. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ दोनशेच्या आत आटोपला. भारतीय संघाने 96 धावांनी विजय नोंदवत फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. आठव्या षटकात कांगारूच्या गोलंदाजांनी सलामी जोडीचा संयमी खेळीला ब्रेक लावला. रघुवंशीच्या (Angkrish Raghuvanshi) रुपात धावफलकावर 16 धावा असताना भारतीय संघाला पहिला धक्का बसला. त्याच्यानंतर हरनूर सिंग (Harnoor Singh) 16 धावांची भर घालून चालता झाला. भारतीय सलामी जोडी स्वस्तात माघारी धाडण्यात कांगारूंना यश आले. सलामी जोडी फुटल्यानंतर कर्णधार यश धूल (Yash Dhull) आणि शैक राशीदनं (Shaik Rasheed) भारतीय संघाच्या डावाला आकार दिला. या जोडीनं द्विशतकी भागीदारी करत संघाला सावरले नाही तर विजयाचा मजबूत पाया रचला. भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करुन विजयी कळस चढवला. यंदाच्या स्पर्धेत भारतीय संघाने एकही सामना गमावलेला नाही. हाच विजयी धडाका कायम ठेवून इंग्लंड विरुद्धच्या सामन्यातील विजयासह वर्ल्ड चॅम्पियन होण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल.

194-10 : हंगरगेकरच्या डायरेक्ट हीटवर टॉम रन आउट, भारतीय संघ फायनलमध्ये

178-9: अर्धशतकीवर शॉचा शो खल्लास, रवी कुमारच्या खात्यात आणखी एक विकेट

167-8 : तांबेनं जॅकला 20 धावांवर धाडले तंबूत

125-7 : टोबिएस स्नेलच्या रुपात ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का, ओस्तवालला मिळाले यश

119-6 : ओस्तवालला दुसरी विकेट, त्याने विल्यमला 7 धावांवर धाडले मागे

101-5 : कांगारूंचा अर्धा संघ तंबूत; निशांतच्या गोलंदाजीवर राधाकृष्णनं 11 धावांवर झाला बोल्ड

83-4 : निशांत सिंधूनं ऑस्ट्रेलियाला दिला चौथा धक्का, भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

73-3 : कॅम्पबेल केल्वेच्या रुपात विक्की ओस्तवालनं उघडंल विकेटचं खातं

71-2 : कॉरी मिलरच्या रुपात ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का, रघुवंशीनं त्याला 38 धावांवर धाडले माघारी

3-1 : रवी कुमारनं दुसऱ्याच षटकात टीम इंडियाला मिळवून दिलं पहिलं यश,

3-1 : रवी कुमारनं दुसऱ्याच षटकात टीम इंडियाला मिळवून दिलं पहिलं यश

निर्धारित 50 षटकात भारत 5 बाद 290 धावा

राशीदचं शतक अवघ्या 6 धावांनी हुकलं, पण त्याने आपल्या 94 धावांच्या खेळीत जबरदस्त फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले

यश धूलनं शतकी खेळीत मारलेला कडक षटकार!

259-5 : राजवर्धनच्या रुपात टीम इंडियाला आणखी एक धक्का, त्याने संघाच्या धावसंख्येत 13 धावांची भर घातली

241-4 : राशीदचं शतक हुकलं; 94 धावांवर जॅकनं घेतली विकेट

241-3 : शतकी खेळीनंतर कर्णधार यश धूल 110C(110) रन आऊट; त्याने राशीदसोबत केली द्विशतकी भागीदारी

यश धूल आणि राशीद जोडी जमली, अर्धशतकी भागीदारीसह संघाचा डाव सावरला

37-2 : दुसरा सलामीवीरही तंबूत, हरनूर सिंग 28 चेंडूत 16 धावा करुन बाद झाला.

16-1 : भारतीय संघाला पहिला धक्का, रघुवंशी 30 चेंडूचा सामना करून अवघ्या 6 धावांची भर घालून परतला तंबूत

असा आहे भारतीय संघ India U19 (Playing XI)

यश धूल (कर्णधार), एस के राशीद, हरनूर सिंग, अंग्रीश रघुवंशी, निशांत सिंधू, राज बावा, कौशल तांबे, दिनेश बना, विक्की ओस्तवाल, रवि कुमार, राजवर्धन हंगरगेकर.

असा आहे ऑस्ट्रेलियाचा संघ Australia U19 (Playing XI):

कॅम्पबेल केल्वे, टीग वायली, कोरी मिलर, कूपर कॉनोली (कर्णधार), लचलान शॉ, निवेथन राधाकृष्णन, विल्यम साल्झमन, टोबियास स्नेल (यष्टीरक्षक), जॅक सिनफिल्ड, टॉम व्हिटनी, जॅक निस्बेट

भारतीय संघाचा कर्णधार यश धूलनं टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं?

SCROLL FOR NEXT