Virat Kohli
Virat Kohli esakal
क्रीडा

Virat Kohli : विराट कोहलीने वर्ल्डकपच्या 48 वर्षात आतापर्यंत जे झालं नाही ते करून दाखवलं; रिकी पाँटिंगलाही टाकलं मागं

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli ODI World Cup Records : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे वर्ल्डकप 2023 च्या फायनल सामन्यात भारच्या पहिल्या तीन विकेट्स पहिल्या 15 षटकांच्या गेल्या. त्यामुळे आता भारताची नाव किनाऱ्याला लावण्याची जबाबदारी विराट कोहलीवर आली आहे.

सुरूवातीला आक्रमक खेळणारा विराट कोहली देखील तीन विकेट्स पडल्यानंतर सावध फलंदाजी करू लागला आहे. दरम्यान, विराट कोहलीने या खेळीदरम्यान एक मोठा विक्रम केला आहे. तो एका वर्ल्डकप एडिशनमध्ये 750 पेक्षा जास्त धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.

त्यातचबरोबर विराट कोहलीने याबरोबरच त्याने वर्ल्डकप इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी कर्णधार रिकी पाँटिंगला मागं टाकले. आता तो दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे.

या यादीत पहिल्या स्थानावर सचिन तेंडुलकर आहे. त्याने 44 डावात 2278 धावा केल्या आहेत. तर विराट कोहलीने 37 डावात 1792 धावा धावा केल्या आहेत. त्याने आज रिकी पाँटिंगला मागं टाकले. रिकी पाँटिंगने 42 डावात 1743 धावा केल्या आहेत.

विराट कोहलीने 63 चेंडूत 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. तो सेमी फायनलप्रमाणे फायनलमध्ये देखील शतक ठोकेल असे वाटत होते. मात्र तो कमिन्सच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला अन् संपूर्ण नरेंद्र मोदी स्टेडियम हळहळलं.

मात्र विराट कोहलीने आपल्या या अर्धशतकी खेळीने अनेक विक्रम केले. विराट कोहलीने 2019 च्या वर्ल्डकपमध्ये सलग 5 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. 2023 च्या वनडे वर्ल्डकपमध्ये देखील विराटने सलग 5 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

विराट कोहली हा 48 वर्षाच्या वर्ल्डकप इतिहासात सेमी फायनल आणि फायनल सामन्यात 50 पेक्षा जास्त धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT