what is mankading
what is mankading  
क्रीडा

What Is Mankading : 'मंकडिंग' म्हणजे काय माहितीये? जाणून घ्या सुरुवात कशी झाली

Kiran Mahanavar

क्रिकेटचा मक्का म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय महिला क्रिकेट संघाने तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात इंग्लंडचा 16 धावांनी पराभव करत मालिका 3-0 अशी जिंकली. महान वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीचा हा शेवटचा सामना होता. झुलनची दिवसभर चर्चा होती, मात्र सामन्याच्या शेवटी दीप्ती शर्माच्या धावबादाची चर्चा सुरू झाली.

दीप्तीच्या या कृतीमुळे इंग्लंडचे खेळाडू आणि क्रिकेट तज्ज्ञ नाराज झालेले दिसत आहेत, तर भारतीय चाहते आणि खेळाडू याला पूर्ण पाठिंबा देत आहेत. या घटनेनंतर चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होतात की मंकडिंग म्हणजे काय? आणि याची सुरुवात कशी झाली. चला जाणून घेऊया.

मंकडिंग म्हणजे काय - (What Is Mankading)

क्रिकेटमध्ये मंकडींगच्या नियमाबाबत नेहमीच वाद झाले आहेत. या नियमानुसार, गोलंदाजाच्या हातातून चेंडू सुटण्यापूर्वी जेव्हा फलंदाज नॉन-स्ट्रायकरच्या टोकाला आपली क्रीज सोडतो, अशा स्थितीत गोलंदाज प्रसंगावधान राखत त्या फलंदाजाला स्टंपवरी बेल्स उडवून बाद करू शकतो असा नियम आहे.

मंकडिंग कधी सुरू झाले?

मंकडिंग वापरणारे दुसरे कोणी नाही भारतीय खेळाडू विनू मंकड होते, ज्यांच्या नावावरून हा नियम ठेवण्यात आला आहे. भारतीय खेळाडू विनू मंकड होते, ज्यांच्या नावावरून हा नियम ठेवण्यात आला आहे. हे पहिल्यांदा 1947 मध्ये वापरले गेले, जेव्हा भारतीय महान विनू मंकडने ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक बिल ब्राऊनला दुसऱ्या टोकाला बाद केले. या घटनेनंतर ऑस्ट्रेलियन मीडियाने मंकड यांच्या या धावबाद करण्याच्या पद्धतीवर प्रचंड टीका केली. मंकडिंग असे नाव दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

IPL 2024, RCB vs GT: विराटचा जबरदस्त डायरेक्ट थ्रो, तर विजयकुमारचा सूर मारत भन्नाट कॅच, पाहा Video

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य (०५ मे २०२४ ते ११ मे २०२४)

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

Sakal Podcast : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ते रावेरमध्ये लोकसभेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT