Wimbledon 2022
Wimbledon 2022 
क्रीडा

Wimbledon 2022 : माजी विजेत्यासमोर विम्बल्डन अजिंक्यपदाचा मार्ग कठीणच

Kiran Mahanavar

Wimbledon 2022 : विक्रमवीर राफेल नदालने उपांत्य सामन्यातून माघार घेतल्यामुळे नोवाक जोकोविचसाठी विम्बल्डन विजेतेपदाचा मार्ग मोकळा झाला अशी शक्यता असली, तरी नदालपेक्षा धोकादायक निक किर्गिऑसचा सामना जोकोविचलला उद्या अंतिम फेरीत करावा लागणार आहे.

तादकवान आणि वेगवान सर्व्हिससाठी किर्गिऑस ओळखला जातो. त्याच्या याच सर्व्हिसची अधिक भीती जोकोविचला आहे. या दोघांमध्ये फारशा लढती झालेल्या नाहीत. अवघे दोन एटीपी सामने झाले आहेत आणि तेही किर्गिऑसने जिंकलेले आहेत, त्यामुळे जोकोविच कसा जिंकणार असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.

२०१७ मध्ये अऐकापॉल्को येथे जोकोविच आणि किर्गिऑस प्रथमच आमनेसामने आले होते, त्याच किर्गिऑसने तब्बल २५ बिनतोड सर्व्हिस करून विजय मिळवला होता. त्यानंतर इंडियान वेल्स येथे १४ बिनतोड सर्व्हिस करून किर्गिऑसने जोकोविचला बेजार केले होते. त्यानंतर हे दोघे आज एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत.

टेनिसमधील धोरणात्मक विश्लेषक ऑ`शानसी हे किर्गिऑसविरुद्धच्या त्या दोन्ही सामन्यांत जोकोविचच्या टीमचे सदस्य होते. त्याच ऑ`शानसी यांच्याकडे जोकोविचचने धाव घेतली आहे. किर्गिऑसच्या वेगवान आणि धारधार सर्व्हिसचा अभ्यास करा आणि त्यावर कसा मार्ग काढता येईल याचे उत्तर मला द्या, अशी विनंती जोकोविचचने ऑ`शानसीकडे केली आहे, पण त्या वेळच्या आणि आताच्या स्थितीत काहीही फरक पडललेला नाही, असे ऑ`शानसीचे म्हणणे आहे.

ऑ`शानसी पुढे म्हणतो, किर्गिऑसकडे दुसऱ्या सर्व्हिसमध्ये वेग कमी-जास्त करण्याची चांगली क्षमता आहे. जोकोविचला त्याच्या सर्व्हिसवर गुण मिळवायचे असतील तर याकडे अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. वास्तविक दुसरी सर्व्हिस हीच किर्गिऑसचे प्रमुख अस्त्र आहे. त्यावरच तो अधिक गुण मिळवतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

Latest Marathi Live News Update: संसदेची सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आजपासून CISF कडं!

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT