पी व्ही सिंधू
पी व्ही सिंधू 
क्रीडा

जगज्जेत्या सिंधूची आश्‍वासक सुरुवात

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : जागतिक विजेतेपदाचे सत्कार सोहळे सुरू असतानाही आपले मिशन ऑलिंपिक गोल्ड कायम होते, हे सिंधूने चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील सलामीच्या लढतीत दाखवले. तिने माजी जागतिक, तसेच ऑलिंपिक विजेत्या ली झुएरुई हिला दोन गेममध्येच पराजित करून आपली तयारी दाखवून दिली.

ऑलिंपिक स्पोर्टस्‌ सेंटर झिनचेंग जिम्नॅशियममध्ये सुरू असलेल्या या दहा लाख डॉलर बक्षीस रकमेच्या या स्पर्धेत साईना नेहवाल पहिल्या फेरीत दोन गेममध्ये पराजित झाली, पण जगज्जेत्या सिंधूने दोन गेममध्ये आणि बी साई प्रणीतने तीन गेममध्ये सलामीची लढत जिंकली. सिंधूने झुएरुईला तिच्या घरच्या कोर्टवर 21-18, 21-12 असे पराजित केले. गुणफलक दर्शवतो, त्यापेक्षा सिंधूचे जास्त वर्चस्व होते. पहिल्या गेममधील 9-9 बरोबरी सोडल्यास ली क्वचितच सिंधूला धक्का देईल असे वाटले. चिनी प्रतिस्पर्धीच्या दुसऱ्या गेममधील 6-2 आघाडीचा लढत संपेपर्यंत विसरही पडला होता.

सिंधूच्या खेळात चांगले वैविध्य होते. तिने क्रॉस कोर्ट रिटर्न्सला ड्रॉप्सची प्रभावी जोड देत प्रतिस्पर्धीस चांगलेच थकवले. लढत संपली, त्यावेळी ली चांगलीच थकलेली दिसत होती, तर सिंधू आगामी लढतीस सज्ज असल्याचेच वाटत होते. पहिल्या गेममध्ये चाहत्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर ली सहज हार मानत नव्हती. तिने गेमच्या उत्तरार्धात सिंधूला 22 शॉटस्‌ची रॅली खेळण्यास भाग पाडले. ही रॅली तिने गमावली, पण स्मॅशेसच्या जोरावर तिने वर्चस्व गमावले नव्हते. दुसऱ्या गेममध्ये सुरुवातीच्या वर्चस्वानंतर सिंधूचीच हुकूमत होती.

साईनाला पहिल्याच फेरीत थायलंडच्या बुसनान ऑगबामरुंघफान हिच्याविरुद्ध 10-21, 17-21 हार पत्करावी लागली. दुसऱ्या गेममध्ये साईनाने चांगली लढत दिली, पण तिचे प्रयत्न अपुरे पडले. बी साई प्रणीतने मोक्‍याच्यावेळी खेळ उंचावत थायलंडच्या सुप्पानयू अविथिंगसानन याला 21-19, 21-23, 21-14 असे पराजित केले.

सिंधूसमोरील आजचे आव्हान
- सिंधूची दुसऱ्या फेरीत लढत पॉर्नपावी चोचुवॉंगविरुद्ध
- जागतिक क्रमवारीत सिंधू पाचवी, तर चोचुवॉंग 15 वी
- दोघींतील तीनही लढतीत सिंधूची सरशी
- दोघीत यंदा एकही लढत नाही, गतवर्षीच्या दोनही लढती तीन गेमपर्यंत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT