India Vs Australia World Cup Cricket 2023 Final Match
India Vs Australia World Cup Cricket 2023 Final Match Sakal
क्रीडा

India Vs Australia CWC 2023 : टीम इंडिया.. विजयी भव! रोहित सेनेवर शुभेच्छांचा वर्षाव

शैलेश नागवेकर

अहमदाबाद - तब्बल ४५ दिवसांपासून सुरू असलेला क्रिकेट विश्वकरंडकाचा रणसंग्राम अखेरच्या टप्प्यात पोचला असून १० पैकी १० सामन्यांत विजय मिळविणारा भारतीय संघ कांगारूंविरुद्धचे अंतिम युद्ध जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या दिमाखदार आणि शानदार लढतीकडे कोट्यवधी भारतीयांचे लक्ष लागून राहिले आहे. एक लाख तीस हजार प्रेक्षक भारतीय टीमला विजयी भव! अशा शुभेच्छा देण्यासाठी उद्या (ता.१९) स्टेडियममध्ये उपस्थित असतील.

एक तप वाट पाहिल्यानंतर पुन्हा एकदा ‘इंडिया फिनिशेस ऑफ इन स्टाईल’ हा जयघोष ऐकण्यासाठी सर्वांचे कान आतुर झाले आहेत. रोहित सेनेसमोर तेवढ्याच तुल्यबळ ऑस्ट्रेलियाचे तगडे आव्हान असेल. इतिहास जरीऑस्ट्रेलियाच्या बाजूने असला तरी उत्तम आणि सातत्यपूर्ण कामगिरीची अमोघ शस्त्रे भारताच्या भात्यात आहे.

याच बळावर भारत मोहीम फत्ते करून आणि तिसऱ्या विजेतेपदाचे स्वप्न साकार करेल, असा विश्वास क्रीडाप्रेमींकडून व्यक्त होतो आहे. ऑस्ट्रेलियाने किल्ला लढविला तर जास्तीत जास्त १०० षटके भारतीयांना सर्वोत्तम खेळ करावा लागेल.

याच ऑस्ट्रेलियाच्या संघाला पराभूत करून भारतीयांनी विश्वकरंडक स्पर्धेची आपली मोहीम सुरू केली होती. त्यानंतर गगन भरारी घेत सलग १० विजय मिळविले होते. पहिल्या दोन सामन्यांतील पराभवामुळे दहाव्या स्थानावर घसरण झालेला ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत दाखल झाला आहे.

भारताचे योद्धे सज्ज

रिकी पाँटिंगच्या ऑस्ट्रेलियन संघाने २००३ च्या विश्वकरंडक स्पर्धेतील अंतिम सामन्यात सुरवातीलाच सौरव गांगुलीच्या भारतीय संघाचे खच्चीकरण केले होते. आता उद्या हा डाव उलटविण्याची जबाबदारी स्वतः रोहित शर्मा घेणार असून त्याच्या साथीला कोहलीने धारण केलेले विराट रूप असेल. श्रेयस पुन्हा यशस्वी ठरला...बुमराचा मारा बुम..बुम ठरला आणि मोहम्मद शमीचा तोफखाना धडाडला तर अख्खा देश जल्लोषात न्हाऊन निघेल यात शंका नाही.

विश्वकरंडकातील कामगिरी

भारत

  • ऑस्ट्रेलियाविरुद्ध : ४ गडी ५२ चेंडू राखून विजय

  • अफगाणिस्तानविरुद्ध : ८ गडी ९० चेंडू राखून विजय

  • पाकिस्तानविरुद्ध : ७ गडी ११७ चेंडू राखून विजय

  • बांगलादेशविरुद्ध : ७ गडी ५१ चेंडू राखून विजय

  • न्यूझीलंडविरुद्ध : ४ गडी १२ चेंडू राखून विजय

  • इंग्लंडविरुद्ध : १०० धावांनी विजय

  • श्रीलंकेविरुद्ध : ३०२ धावांनी विजय

  • दक्षिण आफ्रिकेविरुद्ध : २४३ धावांनी विजय

  • नेदरलँड्सविरुद्ध : १६० धावांनी विजय

  • न्यूझीलंडविरुद्ध : ७० धावांनी विजय

ऑस्ट्रेलिया

  • भारताविरुद्ध पराभव : ६ गडी ५२ चेंडूंनी

  • दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव : १३४ धावांनी

  • श्रीलंकेविरुद्ध : ५ गडी राखून विजय

  • पाकिस्तानविरुद्ध : ६२ धावांनी विजय

  • नेदरलँड्सविरुद्ध : ३०९ धावांनी विजय

  • न्यूझीलंडवर विजय : ५ धावांनी

  • इंग्लंडविरुद्ध : ३३ धावांनी विजय

  • अफगाणिस्तानविरुद्ध : ३ गडी १९ चेंडू राखून विजय

  • बांगलादेशविरुद्ध : ८ गडी ३२ चेंडू राखून विजय

  • दक्षिण आफ्रिकेविरुद्ध : ३ गडी १६ चेंडू राखून विजय

सोन्‍याचे करंडक

देशभरात क्रिकेट फिव्हर शिगेला पोचला असताना नाशिकच्‍या संजय रणधीर यांनी चक्‍क सोन्‍याचे चमचमते विश्वकरंडक साकारले आहेत. त्यांचे आकारमान ०.०८ मिलिमीटर आणि १.७ सेंटीमीटर असे आहे. भारतीय संघ विजेता ठरल्‍यास हे दोन्ही करंडक भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि फलंदाज विराट कोहली यांना भेट म्हणून देण्याचा त्यांचा विचार आहे.

सट्टाबाजार तेजीत

सट्टाबाजारातही भारत आणि ऑस्‍ट्रेलिया यांच्‍यात ‘काँटे की टक्‍कर’ पाहायला मिळत आहे. दोन्‍ही संघांसाठी दर समान असल्‍याने कुठल्‍या संघावर डाव लावावा? असा पेच सटोरींपुढे निर्माण झाला आहे. भारतात सट्टा बाजार अधिकृत नसला तरी छुप्‍या पद्धतीने कोट्यवधींचा जुगार खेळला जातो. भारत विरुद्ध ऑस्‍ट्रेलिया यांच्‍यातील सामन्याकरिता एजंट्‌सकडे दरांची चौकशी केली जाते आहे. या दोन्‍ही संघांचे दर सारखेच आहेत.

आमने सामने

  • विराट कोहली - १० सामने, ७११ धावा

  • ग्लेन मॅक्सवेल - ८ सामने, ३९८ धावा

  • मोहम्मद शमी - ६ सामने, २३ विकेट

  • मिचेल स्टार्क - १० सामने, १३ विकेट

  • रवींद्र जडेजा - १० सामने, १६ विकेट

  • अॅडम झॅम्पा - १० सामने, २२ विकेट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

मोठी बातमी! हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा मृत्यू

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: राजेश पाटलांनी केले मतदान

SCROLL FOR NEXT