Wriddhiman Saha On Rahul Dravid Sakal
क्रीडा

Wriddhiman Saha नं द्रविडबद्दलही फोडला बॉम्ब

सुशांत जाधव

श्रीलंका विरुद्धच्या घरच्या मैदानात होणाऱ्या कसोटी मालिकेतून अनेक वरिष्ठ खेळाडूंना डच्चू मिळाला. अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारासह या यादीत वरिष्ठ यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा (Wriddhiman Saha) च्या नावाचाही समावेश होता. बीसीसीआय निवड समितीने संघाबाहरेचा रस्ता दाखवताना करियरलाचा ब्रेक लावल्याचे साहानं म्हटलं आहे. श्रीलंका विरुद्धच्या मालिकेसाठी संघातून वगळल्यानंतर साहाने धक्कादायक खुलासे केले आहेत. यात त्याने टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दिलेल्या सल्ल्याचाही उल्लेख केला.

संघ व्यवस्थापनासह प्रशिक्षक राहुल द्रविडने (Rahul Dravid) निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला आहे, असे वृद्धिमान साहाने म्हटले आहे. यापुढे कधीच भारतीय संघात निवड होणार नाही, असे सांगितल्यामुळेच रणजी ट्रॉफीतून माघार घेतल्याचेही साहाने सांगितले. पीटीआयच्या वृत्तानुसार, साहा म्हणाला की, “ इथून पुढे भारतीय संघ निवड करताना माझ्या नावाचा विचार होणार नाही, असे संघ व्यवस्थापनाने सांगितले. राहुल द्रविड यांनी निवृत्तीचा विचार करण्याचा सल्ला दिला. जोपर्यंत टीम इंडियाचा भाग होतो तोपर्यंत ही गोष्ट मी बोलू शकत नव्हतो, असेही तो यावेळी म्हणाला.

भारतीय प्रशिक्षकाची धूरा हाती घेतल्यानंतर राहुल द्रविड यांनी टीम इंडियात युवा आणि अनुभव यांचे सुरेख मिश्रण असल्याचे म्हटले होते. त्यामुळे भारतीय संघाचा इथून पुढचा प्रवास हा दोन्ही गटातील खेळाडूंना योग्य ती संधी देऊन पुढे जाईल, असे संकेत त्यांनी दिले होते. अजिंक्य रहाणे आणि पुजारा यांनाही संधी देण्यात आली. ते फ्लॉप ठरल्यानंतर त्यांनाही आता बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. रणजी क्रिकेटमध्ये ते कसे खेळणार यावर त्यांचे भवितव्य अवलंबून असेल. पण साहालाही संधी देण्यात आलेली दिसत नाही. साहाला द्रविड यांनी दिलेला सल्ला त्यांच्या प्रशिक्षक कारकिर्दीतील एक वादग्रस्त सल्ला ठरु शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: 'मी तुम्हाला बोलावलंच नाहीये...' जेव्हा जसप्रीत बुमराहची सटकते; विमानतळाबाहेर रिपोर्टर्सवर भडकला

Pune : लालपरीची काय ही अवस्था? दरवाजाच नाही, तरी प्रवाशांच्या सेवेत; जीव धोक्यात घालून प्रवास

Latest Marathi News Live Update : : मोहोळ पोलिस ठाण्याच्या इमारतीचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

Solapur: ७६ वर्षांनंतर सीनानदी धोक्याच्या पातळीवर; १९४९ नंतरचा सर्वात मोठा पूर, पातळी ४३०.६ मीटरवर

'तिला थंडी ताप आला त्याचं वेळी जर...' आईच्या आठवणीत तेजस्विनीला भावूक होऊन म्हणाली...'आयुष्याचा काही नेम नाही..'

SCROLL FOR NEXT