Leela Instant Food Company
Leela Instant Food Company Sakal
लाइफस्टाइल

स्वयंपाकघरातून अन्न परदेशात

सकाळ वृत्तसेवा

- अनिता चोपडा

माझा मुलगा परदेशात गेल्यावर त्याच्याकडून अनेक गोष्टींबद्दल ऐकलं; परंतु तिकडे भारतीय अन्नपदार्थांची कमतरता आहे. परदेशात आजही अनेक ठिकाणं आहेत, जिथं भारतीय दुकानांची संख्या तुरळक आहे. मात्र, अशा वेळी एवढ्या मैलाचं अंतर पार करणं आपल्यालाही शक्य नसतं, ही खंत वाटली, त्यातूनच व्यवसायाच्या कल्पनेचा चौफेर विचार करण्यास सुरुवात केली.

माझा मुलगा परदेशात असताना त्याला घरच्या जेवणाची आठवण येत असे. तो नेहमी सुटीसाठी घरी आल्यानंतर ‘आई, तू बनवलेलं तिकडे मिळू लागलं, तर खूप लोक खातील गं,’ असं म्हणत असे. त्यामुळे मी त्याला नेहमी दोन ते तीन महिने टिकणारे पदार्थ बनवून देत होते. मात्र, जे पदार्थ खूप काळ टिकू शकत नाहीत, त्या पदार्थांचं काय? मी घरात त्याच्या आवडीचा एखादा पदार्थ बनवला, की त्याची खूप आठवण यायची. यातूनच मला कल्पना सुचली, ती म्हणजे घरचे पदार्थ थेट परदेशात...

कल्पनेचं रूपांतर उद्योगामध्ये

कोरडे पदार्थ खूप काळ टिकून राहतात. आपण तीन ते चार महिन्यांपर्यंत हे पदार्थ स्टोअर करून खाऊ शकतो आणि त्याचा आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. आपण असं काही करू शकलो, ज्यातून आपण बनविलेली ओली भाजी (उदा. पावभाजी) काही महिने टिकून ठेवायची तर त्यासाठी काय करावे लागेल, या विचारातून अभ्यास सुरू केला आणि मी एक मशीन तयार करून घेतलं.

त्या मशीनच्या साह्यानं भाज्यांचं डिहायड्रेशन करता येत होतं आणि त्यामुळे तुम्ही बनवलेली भाजी जास्त काळ टिकू शकते. या मशीनद्‍वारे मी माझ्या मुलासाठी परदेशात मी त्याच्या आवडीचे पदार्थ पाठवू लागले. ‘मां के हाथ का खाना, कहीं भी, कभी भी।’ या ब्रीदवाक्यानं मी ‘लीला इन्स्टंट फूड’ या कंपनीची स्थापना केली.

आईनं, हातानं बनवलेल्या भाजीला या मशीनमध्ये डिहायड्रेट करून त्यातील पाणी काढून घेऊन त्यातलं मॉइश्चर कमी करता येतं. मुख्य म्हणजे या प्रक्रियेत कुठलंही रसायन, नायट्रोजन किंवा प्रीझर्वेटिव्ह वापरले जात नाहीत. भाजीच्या प्रक्रियेला मशीनद्वारे डिहायड्रेट करण्यासाठी साधारण १६-१८ तास लागतात. जे तो त्याला हवं तेव्हा खाऊ शकतो; तसेच कोणतीही आई त्याच्या मुलांसाठी त्याच्या आवडीचे पदार्थ डिहायड्रेट करून त्यांना पाठवू शकते.

प्रक्रीयेसाठी संशोधन

कोणताही व्यवसाय करायचा असेल, तर त्यातील तंत्र पद्धती समजून घेणं गरजेचं असतं. व्यवसायाला संशोधनात्मक अभ्यासाची जोड दिली आणि मशीन तयार करण्यास सुरुवात केली. त्यासाठी खूप वेळ द्यावा लागला. मशीन तयार झाल्यानंतर सुरुवातीला मुलाला ते पदार्थ बनवून पाठवू लागले. जेणेकरून काही बदल करायचे असतील तर तो सुचवू शकेल. हळूहळू त्यांच्यासोबतच्या परदेशातील मित्रांनादेखील हे पदार्थ आवडू लागले आणि यातून मला माझा प्रयोग यशस्वी झाला असं समजलं.

आपल्याकडे इन्स्टंट फूड म्हटलं, की फक्त मॅगी आठवते. या मॅगीत जसे अनेक प्रकार निघाले, तसे आपणही विविध प्रकारच्या भाज्या पाठवू शकतो. यामध्ये मिसळपाव, छोले, पावभाजी, मेथीची भाजी, लाल माठ, भेंडीची भाजी यांचा समावेश तर असतोच; पण त्याचबरोबर अख्खा मसूर, वरण, सांबार, पनीरची भाजी, कुठलीही पंजाबी ग्रेव्ही, तसंच भाताचे सगळे प्रकार ग्राहकांना पाठवणं शक्य आहे.

बाहेर फक्त पंजाबी किंवा ग्रेव्ही भाज्या खायला मिळतात; परंतु हिरव्या पालेभाज्या, डाळी यांची भारतीय नागरिकांच्या मनात वेगळीच जागा आहे. अशा हॉटेलमध्ये सहज उपलब्ध नसणाऱ्या आणि स्वतःच्या घरात बनवल्या जाणाऱ्या कोणत्याही भाज्या दूर पाठविता येतील यासाठी मी माझ्या स्वयंपाकघराचा वापर केला.

परदेशामध्ये पुरवठा

या विषयावर संशोधनात्मक अभ्यास करून त्यानुसार मशिन्स तयार केली आहेत. या इन्स्टंट फूडला कोरोना काळात भरघोस प्रतिसाद मिळाला. त्या काळात हॉटेलं, दुकानं बंद असल्याने बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांसह आयटी क्षेत्रातील नोकरदारांमुळे यांना प्रचंड मागणी वाढली. भारतासह युरोपियन देश, अमेरिका, बेल्जियम, रशिया यासह विविध देशात विद्यार्थ्यांना हे पदार्थ पाठविले जातात.

घरच्या इन्स्टंट फूडचं वैशिष्ट्य

  • डिहायड्रेट केलेलं अन्न फ्रीजबाहेर ६-८ महिने राहू शकतं.

  • एकदा फोडलेले पाकीट पुन्हा बंद करून ठेवता येतं

  • त्यासाठी फ्रिजची आवश्यकता नसते.

(शब्दांकन - सुचिता गायकवाड)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Iran President Helicopter Crash : इब्राहिम रईस यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत खामेनींच्या मुलाचा हात? इराणमध्ये सत्तासंघर्ष पेटणार, जाणून घ्या सविस्तर

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

SCROLL FOR NEXT