Moles On Skin Treatment Sakal
लाइफस्टाइल

Moles On Skin Treatment : चामखीळमुळे बिघडतेय चेहऱ्याचे सौंदर्य? डागविरहित त्वचेसाठी करा हे सोपे उपाय

त्वचेवरील नको असलेले तीळ व चामखीळ काढण्यासाठी उपाय शोधत आहात का? वाचा सविस्तर माहिती...

Harshada Shirsekar

सुंदर, नितळ आणि तजेलदार त्वचा प्रत्येकालाच हवी असते. पण कधी-कधी योग्य पद्धतीने स्किन केअर रूटीन फॉलो न केल्याने त्वचेशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. उदाहरणार्थ मुरूमांची समस्या, त्वचा तेलकट-कोरडी होणे, त्वचा काळवंडणे (Skin Care Tips In Marathi) इत्यादी. तसंच पौष्टिक आहाराच्या अभावामुळे त्वचेवर चामखीळ व तिळ (Mole Removing Tips) देखील येऊ लागतात.

त्वचेवर आलेल्या जाड, काळ्या किंवा तपकिरी रंगाच्या चामखीळ व तिळामुळे सौंदर्य बिघडते. बऱ्याचदा शरीरावर असणाऱ्या तिळाचा उल्लेख ब्युटी मार्क म्हणूनही केला जातो. पण काही जणांच्या चेहऱ्यावर इतके तीळ असतात की त्यांना ते नकोसे होतात. मग या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी काही जण वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्सची मदत घेतात. पण याऐवजी आपण घराच्या घरीही काही साधेसोपे नैसर्गिक उपाय करू शकता...

मध आणि अळशी

चेहऱ्यावरील तीळ-चामखीळची समस्या दूर करण्यासाठी आपण मध आणि अळशीचाही वापर करू शकता. मधामध्ये अँटी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. चामखीळ-तिळाच्या समस्येतून सुटका हवी असल्यास मध व अळशीचे तेल एकत्रित करा. यानंतर हे मिश्रण त्वचेवर लावावे. यामुळे तीळ-चामखीळची समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते. 

नारळाचे तेल (Coconut Oil)

शरीरावरील नकोशा झालेल्या तिळांपासून तुम्हाला सुटका हवी असल्यास आपण नारळाच्या तेलाचा वापर करू शकता. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन नारळाच्या तेलाने हलक्या हातांनी तीळ असलेल्या भागाचा मसाज करावा. नियमित स्वरुपात हा उपाय केल्यास तिळाचा रंग हलका होण्यास मदत मिळू शकते. 

मध आणि हळद (Honey And Turmeric)

निरोगी आरोग्यासाठी मध खूप फायदेशीर मानले जाते. इतकेच नव्हे तर चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठीही बरेच जण स्किन केअर रूटीनमध्ये मध-हळदीचा समावेश करतात. तीळ-चामखीळपासून सुटका हवी असल्यास एक चमचा मधामध्ये चिमूटभर हळद मिक्स करा. यानंतर हे मिश्रण तीळ-चामखीळवर लावा. १५ मिनिटांनंतर कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ करून घ्यावी. यामुळे तिळाची समस्याही दूर होईल व त्वचेवर नॅचरल ग्लो देखील येईल.

कोरडफ (Aloe Vera)

शरीरावरील चामखीळची समस्या दूर करण्यासाठी कोरफडीचा गर रामबाण उपाय मानलो जातो. तीळ व चामखिळीची समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त असे गुणधर्म कोरफडमध्ये आहेत. कोरफडीचा गर काढून रात्रभर चेहऱ्यावर लावून ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा. नियमित उपाय केल्यास तिळाच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. 

NOTE : कोणतेही आयुर्वेदिक व नैसर्गिक औषधोपचार करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसंच यापैकी कोणत्याही गोष्टींची अॅलर्जी असल्यास ते उपाय करू नये.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harmanpreet Kaur: भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने इंग्लंडमध्ये रचला इतिहास!

Video Viral: क्रिकेटच्या मैदानात बाप-लेक भिडले! नबीच्या पहिल्याच चेंडूवर मुलानं मारला खणखणीत सिक्स

Ahmedabad Plane Crash: ''इंधन पुरवठा नियंत्रकात त्रुटी नाही'', एअर इंडियाकडून बोइंग विमानांच्या एफसीएसचा अहवाल सादर

Walmik Karad: वाल्मिकच्या दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला पण मालमत्तेचं काय होणार? उज्ज्वल निकम केस लढणार का?

ENG vs IND: इंग्लंडच्या ओपनर्सला का फैलावर घेतलं? शुभमन गिलने केली पोलखोल; त्यांचा रडीचा डाव जगासमोर आणला

SCROLL FOR NEXT