Children's Day sakal
लाइफस्टाइल

Children's Day: बालदिनी बालकांसाठी खास मराठी संदेश! असा करा चिमुकल्यांचा दिवस खास!

बाल दिनानिमित्त पाठवा या खास शुभेच्छा...

Aishwarya Musale

बालदिन म्हटलं की आपसूक डोळ्यासमोर आपल्या लहानपणी आठवणी तरंगळू लागतात. या दिवशी प्रत्येकजण आप-आपल्या लहानपणीचे किस्से आठवत असतो.

दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून साजरी केली जाते.

नेहरूंचा जन्म 1889 मध्ये झाला आणि ते 'चाचा नेहरू' म्हणून ओळखले जातात. त्यांचे लहान मुलांवर विशेष प्रेम होते. नेहरुंना लहान मुलांची खूप आवड होती.

लहान मुले भारताचे भविष्य आहे असे ते नेहमी म्हणायचे आणि त्यांच्या स्वभावामुळे मुलांनाही ते आपलेसे वाटायचे. निधनानंतर नेहरूंना आदरांजली म्हणून त्यांच्या जन्मदिनी अर्थात १४ नोव्हेंबरला भारतात 'बाल दिन' साजरा करण्यात येतो.

आज आम्ही तुमच्या आयुष्यातील लहान मुलांना बालदिनाचे शुभेच्छा देण्यासाठी एकापेक्षा एक भारी संदेश सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

१. खऱ्याखुऱ्या लहानग्यांसोबतच

तुम्हा आम्हा प्रत्येकातल्या

लहान बाळाला सुद्धा

बालदिनाच्या खूप शुभेच्छा!

२.  फक्त मुलांनाच हा विश्वास असतो की, 

ते सर्वकाही करू शकतात. 

अशा निरागस मुलांना बालदिनाच्या गोड शुभेच्छा

३. बालपणी होते स्वछंद खेळाचे क्षण..

बालपणी होते सर्व सुखाचे धन..!!

बालपणीच्या आठवणीत हरपते मन..

येणार नाहीत कधीच ते सोनेरी क्षण.

बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

४. पाखरांची चपळता,

प्रात:काळाची सौम्य उज्ज्वलता

नि झऱ्याचा खळखळाट

म्हणजे मुले...

बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

५. तुम्हाला पाठवत आहे शुभेच्छांचा गुच्छ…

प्रेमाने भरलेला तुमचं आयुष्य सुगंधित करण्यासाठी…

आनंदी राहा आणि आठवणी जपा…

बालदिनाच्या सुंदर शुभेच्छा.

६. कोनाड्यात पडलेल्या
जुन्या आठवणींना
पुन्हा एकदा डोळ्यासमोर आणायचं आहे,
आज आपलं हरवलेलं बालपण,
पुन्हा नव्याने जगायचं आहे,
बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा !

७. जगातील सर्वात चांगला वेळ,
जगातील सर्वात चांगला दिवस,
जगातील सर्वात सुंदर क्षण
फक्त बालपणीच मिळतात.
Happy Children’s Day

८. मनात बालपण जपणाऱ्या सर्वांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

९. कागदाची नाव होती, पाण्याचा किनारा होता, मित्रांचा सहारा होता, खेळण्याची मस्ती होती, मन हे वेडे होते, कल्पनेच्या दुनियेत जगत होतो, कुठे आलो या समजूतदारीच्या दुनियेत, या पेक्षा ते भोळे बालपणच सुंदर होते... बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Government Farmers Gift: मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; कॅबिनेटमध्ये घेण्यात आले तीन महत्त्वाचे निर्णय!

Gautami Naik Exclusive: गल्ली क्रिकेट ते स्मृती मानधनाची बॅटिंग पार्टनर! किरण मोरेंनी हेरलेल्या गौतमी नाईकचा कसा राहिला प्रवास

Sun Transit Cance: १६ जुलैपासून सूर्याचा कर्क राशीत प्रवेश! वृषभ, धनु आणि मीन राशींना मिळणार विशेष लाभ, जाणून घ्या तुमचं राशी भविष्य

Uddhav Thackeray-Eknath Shinde Video: ''ते आले, त्यांनी पाहिलं अन् मग त्यांनी...'' ; उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे आमने-सामने!

अमरीश पुरी नाही, 'हा' अभिनेता असता 'मिस्टर इंडिया'चा मोगॅम्बो; अचानक दाखवला बाहेरचा रस्ता, आजही होतोय पश्चाताप

SCROLL FOR NEXT